रेमडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यानो..विशेष पथकाचे आहे लक्ष!

Maharashtra Police Special Squad to Check Black Marketing of Remdisivir
Maharashtra Police Special Squad to Check Black Marketing of Remdisivir

मुंबई : महाराष्ट्रात रेमडिसिवीरचा Remdisivir काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी Maharashtra Plice विशेष पथक तयार केले आहे. हे पथक स्वतंत्रपणे त्यांची कारवाई करत आहे. सोशल मीडियावरही Social Media अशा पद्धतीची फसवणूक करणाऱ्यांवर सायबर पोलिसांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या विशेष पथकाने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात  ५४ गुन्हे नोंदवलेले आहेत. Maharashtra Police Formed Special Squad to Check Remdisivir Black Marketting

राज्यात कोरोनाची दुसरी लाट Corona Second Wave आल्यानंतर रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला. या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजार Black Marketting करणाऱ्यांचे चांगलेच फावले. सुमारे १२०० रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन वीस -पंचवीस हजारांना विकण्याच्याही घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. 

हे देखिल पहा-

या कारवाईत आतापर्यंत पुणे १०, नागपूर ११ औरंगाबाद ४, पुणे, नवीमुंबई, जळगाव प्रत्येकी ३, सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती सूञांनी दिली आहे. महाराष्ट्रात रुग्णालयाला लागत असलेल्या आगी संदर्भात सर्व जिल्ह्यातील एसपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील रुग्णालयांना 'फायर आॅडिट" Fire Audit करण्याच्या सूचना देण्यास सांगितले आहे. भंडारा, नाशिक, मुंबई या ठिकाणी आग व आॅक्सिजन लिकेज सारख्या घटना घडल्या आहे. अशा सारख्या घटना घडू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. Maharashtra Police Formed Special Squad to Check Remdisivir Black Marketting

विविध जिल्ह्यांमध्ये आँक्सिजन टँकर Oxygen Tanker अडवून दुसरीकडे वळविण्याचे प्रकारही घडले आहेत. ते रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी विविध जिल्ह्यात ५० ते १०० जणांचे 'एस स्काँड' बनवले आहे. हे टँकर ज्या ज्या जिल्ह्यातून परिसरातून जातात,  त्या त्या पोलिस ठाण्यातून आँक्सिजन सिलेंडर टँकरला सुरक्षा पुरवली जाते आहे. 

आतापर्यंत १ लाख ३८ हजार नागरिकांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ईपास E-pass मिळावा म्हणून परवानगी दिली आहे. तर २ लाख ८७ हजार ४७७ जणांचे ईपास आतापर्यंत नाकारण्यात आले आहेत. तर १५ हजार ५०६ ईपास अद्याप पेंडिग आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.
Editd By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com