Maharashtra: कोरोना रुग्णांसाठी दिलासा; उपचारासाठी नवे दर जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जून 2021

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागाला दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे.

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागाला दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रचंड मोठा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्याबाबत सूचना देखील काढली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करत दर निश्चित केले आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर निश्चित करता येणार नाही. या अधिसूचनेची परिणामकारक अमंलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी राज्यशासनाने निश्चित केलेल्य़ा दरानुसार आणि उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली आहे. आज वाढीव मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.(Maharashtra: Relief for Corona patients; Announced new rates for treatment)

हे देखील पाहा

अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये एवढी आकारणी करण्यात आली आहे . यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च  व जेवण याचा समावेश असणार आहे. कोरोना चाचणीचा खर्च निश्चित  दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या आणि तपासणी त्याचबरोबर उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळण्यात आली आहे.

Edited By : Pravin Dhamale


संबंधित बातम्या

Saam TV Live