महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असुरक्षित 

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 12 मे 2020

मुंबईसह महाराष्ट्रात शेकडो सुरक्षा खासगी एजन्सी आहेत. यामध्ये देशभरातील लाखो लोक काम करीत आहेत. या सर्व एजन्सी कंत्राटावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करतात. गृहनिर्माण सोसायटी, कार्यालये, कंपन्या तसेच विविध आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या खासगी सुरक्षारक्षकांप्रमाणेच मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाची अवस्थाही अशीच आहे. यामध्ये सुमारे नऊ हजार जवान कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून राज्यातील सुमारे १६२ संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

करोनाबाधित रुग्णालयांमध्ये जीव धोक्यात घालून हे जवान काम करीत आहेत. मुंबई, पुण्यात अनेक जवानांना करोनाची लागणही झाली आहे. मात्र या आपत्कालीन परिस्थितीत केवळ प्रवास भत्ता वगळता कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने हे जवान धास्तावले आहेत. ज्या जवानांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे, अशांची राहण्याची, जेवणाची, पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे करोनाची लागण झाल्यास उपचारासाठी रुग्णालय, आरोग्य विमा तसेच मृत्यू ओढवल्यास कुटुंबीयांना आर्थिक भरपाई मिळावी, अशी या जवानांची तसेच त्याचप्रमाणे कंत्राटावर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची मागणी आहे. त्यातच सर्व आस्थापने बंद असल्याने त्यांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. 

मुंबईसह महाराष्ट्रात शेकडो सुरक्षा खासगी एजन्सी आहेत. यामध्ये देशभरातील लाखो लोक काम करीत आहेत. या सर्व एजन्सी कंत्राटावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करतात. गृहनिर्माण सोसायटी, कार्यालये, कंपन्या तसेच विविध आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या खासगी सुरक्षारक्षकांप्रमाणेच मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाची अवस्थाही अशीच आहे. यामध्ये सुमारे नऊ हजार जवान कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून राज्यातील सुमारे १६२ संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

 आरोग्य विमा नाही, करोना संकटात मृत्यू ओढवल्यास कुटुंबीयांसाठी आर्थिक तरतूद नाही, तुटपुंजा पगार या असुविधांमुळे हे सर्व सुरक्षारक्षक हवालदिल आहेत.करोनाच्या संकटात डॉक्टर आणि पोलिस यांच्यासोबत महाराष्ट्र सुरक्षा बलाप्रमाणे कंत्राटी पद्धतीवर असलेले अनेक खासगी सुरक्षारक्षक जीव धोक्यात घालून लढत आहेत. आपत्कालीन सेवेत लढा देत असताना कोणत्याच सेवासुविधा मिळत नसल्याने कंत्राटी सुरक्षारक्षक चिंतेत आहेत.

WebTittle :: Maharashtra Security Force personnel insecure

संबंधित बातम्या

Saam TV Live