गेल्या २४ तासात राज्यात ६३ हजार २८२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर ६१ हजार ३२६ रूग्ण कोरोनामुक्त

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास भारतभर सुरूवात देखील झाली आहे. मात्र अद्यापही रूग्णसंख्येतील वाढ आणि रूग्णांचे मृत्यू वाढण्याचा एकदा सुरूच आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.

मुंबई: राज्यातील कोरोना Corona संसर्ग दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढू लागला आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात Maharashtra  आढळून येत आहेत. रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लॉकडाऊन Lockdown सुरु केला होता. या सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी आता १५ मे May पर्यंत वाढवण्यात आला आहे. शिवाय, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास Vaccination भारतभर सुरूवात देखील झाली आहे. मात्र अद्यापही रूग्ण संख्येतील वाढ आणि रूग्णांचे मृत्यू सुरूच आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.Maharashtra State corona Updates

याशिवाय गेल्या २४ तासात ६१ हजार ३२६ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सुद्धा परतले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ८४.२४ टक्के एवढ झाले आहे. सध्या राज्यात ४०,४३,८९९ कोरोना रुग्ण होमक्वारंटाईन आहेत. तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये Quarantine आहेत. राज्यात एकूण ६,६३,७५८ सक्रिय रुग्ण आहेत.

तर, पुणे Pune शहरात गेल्या २४ तासात ४ हजार ६९ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६७ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या ४ लाख २३ हजार ५८७ इतकी झालेली आहे. आजपर्यंत ६ हजार ८६४ रूग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. तर ४ हजार ३३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज पर्यंत ३ लाख ७३ हजार ८१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live