कोरोना विषाणूचा संशयित रुग्णाचा बुलडाण्यात मृत्यू

साम टीव्ही न्यूज
रविवार, 15 मार्च 2020

जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित पीटीआयशी बोलताना म्हणाले की, रुग्णाला काही दिवसांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचा संशय होता. रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी दुपारी एका ७१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती सौदी अरेबियातून परतली होती.  जर या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले तर या घातक विषाणूने मृत्यू होण्याचे हे तिसरे प्रकरण ठरेल. 

 

हेही वाचा : कुठे दिलासा तर कुठे निराशा: कोरोनाबाबत जाणून घ्या देशाची सध्याची स्थिती

शनिवारी सकाळी त्याला कोरोना विषाणूचे लक्षण दिसू लागल्यामुळे बुलडाणा जनरल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती बिघडत गेली आणि दुपारी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित पीटीआयशी बोलताना म्हणाले की, रुग्णाला काही दिवसांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

 देशातील सर्वाधिक रुग्ण आता महाराष्ट्रातील आहेत.दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून ती २६ झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

Web Title:Maharashtra Suspected coronavirus patient dies in Buldhana 


संबंधित बातम्या

Saam TV Live