नारायण राणेंच्या बालेकिल्ल्याचं काय होणार?

 नारायण राणेंच्या बालेकिल्ल्याचं काय होणार?


सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदाऱसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे यांना शिवसेनेने उघडपणे आव्हान दिले
आहे. शिवसेनेने राणेंचे खंदे सर्मथक आणि नुकतीच त्यांची साथ सोडून शिवसेनेत आलेले सतीश सावंत यांना कणकवलीच्या आखाड्यात उतरवले आहे. त्यामुळे
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या आणि राणेंसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या जागेवर कोण बाजी मारणार याचा फैसला आज दुपार पर्यंत होणार आहे.

राज्यात कणकवली मतदारसंघात युती नसल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. यात राणेविरुद्ध शिवसेना असा
मुकाबला रंगल्याने कणकवलीची लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे.
2014 च्या लढतीत कणकवली मतदारसंघातून आमदार नीतेश राणे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर नारायण राणेंच्या जुन्या शिलेदारांशी त्यांचे फारसे
सख्य राहिले नाही. त्यांनी आपली स्वतंत्र टिम बांधण्यावर भर दिला. हळूहळू राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते आदींनी राणेंची साथ सोडली. आता राणेंचे
उजवे हात मानले जाणारे सतीश सावंत यांनीही राणेंशी काडीमोड घेतला आहे.

सावंत 2009 पासूनच आमदार होण्यासाठी इच्छुक होते. राणेंकडूनही त्यांना तसा शब्द देण्यात आला; पण 2009 मध्ये रवींद्र फाटक यांना, तर 2014 मध्ये नीतेश
राणे यांना कणकवलीतून उमेदवारी मिळाली. मात्र या वेळी नीतेश राणे हेच भाजपचे उमेदवार असल्याने पुन्हा एकदा सतीश सावंत यांना कात्रजचा घाट दाखविण्याचा
प्रयत्न झाला. मात्र सावंत यांनी आधीच सावध होत राणेंपासून फारकत घेतली.
सावंत यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेत शिवबंधनात अडकले.
 
कणकवलीसह जिल्ह्यात सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शेती आणि सहकाराच्या माध्यमातून ते अनेक संस्थांशी जोडले गेले आहेत. सावंत आमदार होण्यासाठी
त्यांच्या समर्थकांची फौज गेली दोन वर्षे मेहनत घेत होती. त्यामुळे सावंत यांचे कडवे आव्हान आमदार राणे यांच्यापुढे आहे.

सावंत यांनी राणेंची साथ सोडल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह सिंधुदुर्गातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची
बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या. याखेरीज सतीश सावंत कणकवली मतदारसंघातून लढत असतील तर
एकास एक उमेदवार देऊन राणेंना शह देण्यासाठीही इतर पक्षांकडून चाचपणी केली गेली.
https://www.saamtv.com/marathi-news-article-rane-future-election-7427
कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघातही शिवसेना उमेदवारांविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवारांसाठी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपच्या
जिल्ह्यातील मंडळींनी जोरदार प्रचार राबवला. त्यामुळे कणकवलीसह कुडाळ आणि सावंतवाडीत काय निकाल लागतो याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

नारायण राणे यांच्याबद्दलचा कुठलाही निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. असे असले तरी
गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर अखेरपर्यंत राणेंच्या प्रवेशाला विरोध करत होते. हिंसक प्रवृत्तीला थारा देऊ नका, असे आवाहनच
त्यांनी भाजपला केले होते. त्यामुळे भाजप राणेंना किंवा त्यांच्या मुलाला थेट पक्षात प्रवेश देईल का, याबाबत साशंकता होती. मात्र तरीही नीतेश राणेंचा प्रवेश झाला.
कणकवली मतदारसंघात कणकवलीसह देवगड आणि वैभववाडी तालुके येतात. मुळात हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा गड मानला जायचा. गेल्या
वेळी काँग्रेसकडून नितेश राणे निवडून आले. येथे राणे विरुद्ध युतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपचा मुकाबला व्हायचा. मात्र, या वेळी नीतेश यांना भाजपने उमेदवारी
दिली. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने राणेंपासून दुरावलेले जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. सावंत हेही लढतीतील तगडे दावेदार मानले
जातात. शिवसेनेने त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली. येथे शिवसेना विरुद्ध राणे असा मुकाबला रंगलाय.

राणे व सावंतांच्या जमेची व पडती बाजू     

नीतेश राणे - राणेंचा कौटुंबिक राजकीय वारसा असल्याने त्यांना राजकारणातील अनुभव आहे. पण, सक्रिय राजकारणात नितेश राणे गेल्या 6 वर्षांपासून
आलेयत...पदार्पणातच म्हणजे 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या प्रमोद जठार यांचा पराभव केला. त्यावेळी नितेश राणे 25 हजार मतांनी निवडून आले. गेल्या पाच
वर्षात नितेश राणे यांनी दांडगा लोकसंपर्क वाढवला, मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले, छोटी मोठी कामंही केली. पण, अचानक भाजपमध्ये जाऊन उमेदवारी
मिळवल्याने निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. तडकाफडकी पक्ष बदलल्याने वयोवृद्ध असो किंवा सामान्य मतदार यांना नितेश राणे कोणत्या चिन्हावर
निवडणूक लढतायत हेदेखील माहित नाही. याचा फटका मतांमधून नितेश राणेंना बसू शकतो. पण, नितेश राणे हे ईव्हीएमवर प्रथम क्रमांकावर असल्याने थोडा का
होईना त्याचाही फायदा होऊ शकतो.

सतीश सावंत - गेली 24 वर्षे राजकारणात जम बसवलाय. शिक्षकाचा मुलगा अशी ओळख असलेल्या सावंतांनी 24 वर्षे नारायण राणेंसोबत काम केले आहे. जिल्ह्यातील राजकारणात सावंतांनी अनेक मोठी पदं भूषवली...बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सह्याद्री पट्ट्यातील नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्व हीच सतीश सावंतांची जमेची बाजू आहे. तर राणेंसोबत कित्येक निवडणुकीसाठी काम केल्यानं राणेंची निवडणुकीची रणनिती चांगलीच माहिती आहे. पण, स्थानिक निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विधानं, भांडणाच्या काही क्लिप विरोधक व्हायरल करत असल्याने त्याचा फटका बसू शकतो.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Kankavali Kudal Sawantwadi trends

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com