महत्त्वाच्या शहरांमध्ये  शिवसेनेला भोपळा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपने नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकही जागा दिली नाही. भाजपच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत या शहरांतल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मात्र, आता या शहरांमधल्या शिवसैनिक, पदाधिकारी, शाखा- विभागप्रमुखांसमोर पुढे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तिकीट न मिळाल्यास किमान ‘धनुष्यबाणा’चा तरी प्रचार करणाऱ्या शिवसैनिकांना आता ‘कमळा’चा प्रचार करावा लागेल. या जागा निवडून आल्यास भविष्यातही त्या न मिळण्याची शक्‍यताच अधिक असेल. तसेच, संघ-भाजपचे जाळे आणि आमदार असताना सामान्य शिवसैनिकांकडे जनता आली नाही, तर या शहरांत पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्नही उभा ठाकणार आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत मुंबई वगळता मुख्य शहरांमधील २९ जागांपैकी शिवसेना फक्त ६, तर भाजप २३ जागा लढविणार आहे. ही सर्व शहरे वाढत्या लोकसंख्येची आहेत. यातील अनेक ठिकाणी भाजप महापालिकेत सत्तेवर आहे. पुणे, नागपूरमध्ये तर नगरसेवक- आमदार- खासदार असे सगळेच भाजपचे आहेत. या स्थितीत शिवसेनेसाठी फक्त ही निवडणूकच नव्हे, तर अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागू शकतो. युतीत धाकटेपणा आला असताना आता शहराशहरांतही भाजपचे थोरलेपण शिवसेनेला मान्य करावे लागणार आहे.

शहर            एकूण जागा    शिवसेना       भाजप
मुंबई               36                 19             17
ठाणे                04                 03             01
पुणे                 08                 00             08
नाशिक            03                 00             03
नवी मुंबई        02                 00              02
नागपूर            06                 00             06

Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 New Mumbai Pune Nashik Nagpur Shvsena Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live