भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

राज्यातील मंदिरे उघडी करा या मागणीसाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल सागर आव्हाड

पुणे : कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, जगदीप मुळीक आ.मुक्ता टिळक, महापालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच भाजप नगरसेवक यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेल्या 30 ते 40 भाजप कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल झाला असून आंदोलनावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपने आज सायंकाळच्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करत राज्यातील मंदिरे उघडी करण्यासाठी सरकार विरोधात हे आंदोलन केले होते.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com