एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार मिटकरी यांना मागितली भीक!

आज अकोल्यातील आगार क्रमांक 2 येथील एसटी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातील मुख्य मार्गावर एसटी गणवेशात भीक मागो आंदोलन केलं.
एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार मिटकरी यांना मागितली भीक!
एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार मिटकरी यांना मागितली भीक!SaamTVNews

अकोला : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दरम्यान काम बंद असल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाकडून अद्यापही या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. म्हणून आज अकोल्यातील (Akola) आगार क्रमांक 2 येथील एसटी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातील मुख्य मार्गावर एसटी गणवेशात भीक मागो आंदोलन केलं.

हे देखील पहा :

यावेळी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, ऑटो चालकांना या कर्मचाऱ्यांनी भीक मागितली. दरम्यान तेथूनच जाणारे राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी थांबवून त्यांनाही या एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागितली. परंतु आमदारांनी भीक दिली नाही, मात्र सरकार खंबीरपणे शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं त्यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार मिटकरी यांना मागितली भीक!
बनायचं होत डॉक्टर, बनला खुनी; एका चापटचा बदला मित्राचा खून करून घेतला!

एसटी (ST) विलीनीकरणाची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आणि त्यांचे प्रश्न रास्त असल्याचं आमदार मिटकरींनी सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल, परंतु विलीनीकरणासंदर्भात मी सांगू शकत नाही असेही मिटकरी यांनी स्पष्ट केलंय. महामंडळाच विलीनीकरण होणार नाही, असं मागच्या काळात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही अर्थमंत्री असताना सांगितलं होतं. असाही मिटकरी यांनी नकार न देता स्पष्ट केलंय.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.