नांदेडच्या 'या' कुटुंबानी समाजासमोर ठेवला आदर्श; साखरपुड्यातच उरकले लग्न

लग्न सोहळ्यावर होणारा खर्च लक्षात घेता पावडे- देशमुख कुटुंबियांनी साखरपुड्यातच लग्न सोहळा उरकवून समाजात आदर्श निर्माण केला आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन हंबर्डे यावेळी उपस्थित होते.
नांदेडच्या 'या' कुटुंबानी समाजासमोर ठेवला आदर्श; साखरपुड्यातच उरकले लग्न
साखरपुड्यातच लग्न सोहळा

प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोनामुळे गर्दीवर निर्बंध असल्याने अनेक कार्यक्रमांसह लग्न सोहळेही पुढे ढकलावे लागत आहे. परंतु, लग्न सोहळा पुढे न ढकलता साखरपुड्यातच लग्न व्हावे यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी पावडे व देशमुख कुटुंबियांना सांगितले. त्यानुसार दोन्ही कुटुंबियांनी साखरपुड्यातच हा लग्न सोहळा उरकवून समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.

दोन्हीकडील कुटुंबियांनी ठरविल्यानुसार रविवारी (ता. ११) तुप्पा येथे दत्त मंदिर परिसरात शीतल त्रिंबकराव देशमुख आणि अमृत उर्फ पप्पू अशोकराव पावडे यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी दोघांनीही पावडे व देशमुख कुटुंबियांना साखरपुड्यातच विवाह उरकवून घेण्याचा सल्ला दिला. दोघांनीही त्याला होकार देत रविवारी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी शीतल आणि अमृत यांचा विवाह पारंपरिक प्रथांना छेद देवून लावून देण्यात आला.

हेही वाचा - चोहूबाजूने तीन ते चार फुट पाणी साचल्याने गावातील प्रकाश कदम, शिवाजी पुयड, नागनाथ तोकलवाड, विनय शिंदेसह गावकऱ्यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवत झाडावरील मनिष यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले

या सोहळ्याला आंनदबन महाराज कौलंबीकर, गिरीष पत्की, श्रीकांत ठाकुर, सुनिल हंबर्डे, राजु हंबर्डे, नवनाथ फावडे, महैद्रसिंग फौजी, रामराव हंबर्डे, शामराव हंबर्डे यांच्यासह देशमुख व पावडे परिवारातील ४० सदस्य उपस्थित होते. देशमुख व पावडे परिवाराने अनाठायी खर्चाला फाटा देत हा आदर्श विवाह सोहळा घडवून आणला असून समाजात आदर्श घेण्यासारखा हा विवाह सोहळा झाल्याचे उपस्थित दोन्ही परिवारातील सदस्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com