Yavatmal : सोनार लाईन परिसरात खळबळ; धूम स्टाईलने पावणे तीन लाखांवर चाेरट्यांचा डल्ला

पाेलिसांचा तपास सुरु आहे.
yavatmal, cash stolen
yavatmal, cash stolensaam tv

- संजय राठाेड

Yavatmal Crime News : यवतमाळ (yavatmal latest news) शहरातील सोनार लाईन परिसरात लक्ष्मीनारायण प्रताप यांच्याकडील सुमारे पावणे तीन लाखाची रक्कम चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली. अज्ञात चोरट्याचा पोलिस (yavatmal police) तपास करीत आहेत. (Maharashtra News)

yavatmal, cash stolen
Dhulivandan 2023 : प्रेम विवाह करणाऱ्या जावयाची पहिल्यांदाच गावातून वाजत गाजत मिरवणूक (पाहा व्हिडिओ)

यवतमाळ पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लक्ष्मीनारायण प्रताप हे बँकेतून पावणे तीन लाखाची रोख‎ रक्कम काढून दुचाकीवरुन घरी निघाले हाेते. त्यांच्या‎ दुचाकीला लाथ मारून अनोळखी‎ दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून पळ काढला. हे चोरटे सीसीटीव्ही‎ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

yavatmal, cash stolen
SSC Exam 2023 : दहावीचा गणिताचा पेपर पुण्यात फुटला ? बिबवेवाडी पोलिस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल

या‎ प्रकरणी लक्ष्मीनारायण प्रताप (वय ५५‎ वर्ष रा. माळीपूरा, यवतमाळ) यांनी‎ दिलेल्या तक्रारीवरून शहर‎ पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात‎ गुन्हे नोंद केला आहे.‎ लक्ष्मीनारायण प्रताप यांच्या घराचे‎ बांधकाम असल्याने ते पैसे‎ काढण्यासाठी त्यांच्या मुलासमवेत बँकेत गेले होते.‎ पैसे काढून घरी परतताना घटना घडली. लक्ष्मीनारायण प्रताप आणि त्यांचा‎ मुलगा सागर यांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी‎ दुचाकीस्वारांचा पाठलाग केला.‎ मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले.‎

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com