विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा; 2 आरोपी गजाआड

दीड वर्षापासून शोध सुरु असलेल्या विदर्भ ग्रामीण पतसंस्था येथे 1 कोटी 11 लाख रूपयाच्या घोटाळा करणाऱ्या 2 आरोपीना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे.
विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा; 2 आरोपी गजाआड
विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा; 2 आरोपी गजाआडअभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया : दीड वर्षापासून शोध सुरु असलेल्या विदर्भ ग्रामीण पतसंस्था येथे 1 कोटी 11 लाख रूपयाच्या घोटाळा करणाऱ्या 2 आरोपीना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी योगेशसिंग बैस संचालक विदर्भ ग्रामीण पतसंस्था व प्रल्हाद राउत लेखापाल असे अटक करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

सालेकसा तालुक्यातिल साकरीटोला येथे विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था उभारण्यात आली असून लोकांनी विश्वासाने ठेव जमा केली होती. मात्र संस्थेचे अध्यक्ष व अभिकर्ता योगेशसिंह शेरसिंह व लेखापाल प्रल्हाद राऊत यांनी सदर संस्थेच्या ठेवीदारांची ठेवीच्या स्वरुपात जमा केलेल्या रक्कमेची कोणत्याही कारणाशिवाय परस्पर स्वार्थासाठी वापरून घेतली.

विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा; 2 आरोपी गजाआड
लस नाही तर वेतन नाही; महापालिकेच्या आयुक्तांचा फतवा

एवढेच नव्हे तर बोगस कर्ज वाटप ही दाखविले. ही बाब झालेल्या लेखा परिक्षणात स्पष्ठ होत तब्बल 1 कोटी 10 लाख 87 हजार 194 रुपयांचा घोटाळा उघड़ झाला होता. लेखा परिक्षकाच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध कलम 406, 409,420, 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद होता. यात आरोपींना अटक करण्यास गेल्यास आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांना आरोपी सतत हुलकावनी देत राहिले. अखेर दीड वर्षा नंतर पोलिसांनी त्यांच्या सुगावा लावत दोन्ही आरोपी ला अटक केली आहे. तर या पुढील तपास सालेकसा पोलिस करीत आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com