Latur: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची राज्यभर चर्चा; साकारली १००० फूट तिरंगा ध्वजाची प्रतिकृती

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त सर्व अहमदपूरकरांनी कधी नव्हे ते मुख्य रस्त्यावरील महाकाय अशा तिरंगा ध्वजाची प्रतिकृती पाहीली.
Latur News
Latur NewsSaam TV

लातूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नगरपरिषद अहमदपूर व सम्राट मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या 1000 फूट लांबीच्या शौर्याचे व त्यागाचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज प्रतिकृतीची तिरंगा रॅलीने लातूर जिल्ह्यातील (Latur District) अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. (Amrit Mahotsav of Freedom)

ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, शहीद गौतम वाघमारे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सावरकर चौक या मार्गे मार्गस्थ झाली. यावेळी तिरंगा ध्वजावर अहमदपूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत जागोजागी पुष्प वर्षाव करत या तिरंगा रॅलीचे स्वागत केले.

पाहा व्हिडीओ -

भारत माता की जय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू होवो; जय हिंद अशा राष्ट्रप्रेरक घोषणेने संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेले एकूणच या तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम केले. हा अमृत महोत्सव जन भागीदारी आणि जन आंदोलन’च्या भावनेने साजरा केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त सर्व अहमदपूरकरांनी कधी नव्हे ते मुख्य रस्त्यावरील महाकाय अशा तिरंगा ध्वजाची प्रतिकृती पाहीली. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज येथे सामूहिक राष्ट्रगीत गाऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. एन.सी.सी, एन.एस.एस तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे युवक युवती सहभागी झाले होते. विविध शाळा शाळांचे विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक, नगरपरिषद कर्मचारी, आरोग्य विभाग सहभागी झाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com