जालना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ; 103 डॉक्टर निघाले बोगस

166 डॉक्टर नोंदणी न करता करताय व्यवसाय,आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाला आली जाग.....
Jalna News
Jalna NewsSaam Tv

जालना - जिल्ह्यात तब्बल 103 डॉक्टर्स (Doctor) बोगस निघाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात जोरदार खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश देऊन कारवाई करण्याची सूचना केली होती.

त्यानंतर उशिरा जाग आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेत जिल्ह्यातील 103 डॉक्टर्स बोगस निघाले असल्याची माहिती खुद्द जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

जिल्ह्यात नोंदणीकृत 267 डॉक्टर्स असून नोंदणी न झालेल्या व नोंदणी नसताना व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची संख्या 166 ईतकी आहे.जालना तालुक्यात सर्वाधिक 25 डॉक्टर बोगस आहेत.तर त्या पाठोपाठ भोकरदनमध्ये 24,जाफ्राबादमध्ये 17,बदनापूरमध्ये 10,घनसावंगीत 9,परतूरमध्ये 8,अंबडमध्ये 6,मंठ्यात 4 डॉक्टर बोगस निघाले आहेत.

जिल्ह्यात ईतके डॉक्टर बोगस असताना आतापर्यंत आरोग्य यंत्रणा काय करत होती,की या डॉक्टरांची आरोग्य विभागासोबत सेटलमेंट आहे असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत केला जात आहे.

Jalna News
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न

जालना जिल्ह्यात मुलं-मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत असून पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.कुणालाही याबाबतीत पाठीशी घालणार नाही.असं सांगत या कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या नंतर कारवाई नंतर ही धक्काडायक माहिती समोर आल्या नंतर एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com