मुसळधार पावसामुळे सोळा वर्षांनंतर उघडले विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे

हे दरवाचे उघडल्यामुळे जवळपास ३०० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसामुळे सोळा वर्षांनंतर उघडले विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे
मुसळधार पावसामुळे सोळा वर्षांनंतर उघडले विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे संतोष जोशी

नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पाचे (Vishnupuri project) ११ दरवाजे उघडले असून या दरवाजांमधून एक लाख ३२ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे या प्रकल्पाचे दरवाचे हे तब्बल सोळा वर्षांनंतर उघडले असून हे दरवाचे उघडल्यामुळे जवळपास तीनशे गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 11 doors of Vishnupuri project opened

हे देखील पहा-

नांदेड (Nanded) जिल्ह्य़ात धुवांधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीवरील (Godavari River) विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत या दरवाज्यातून तब्बल एक लाख ३२ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा सुरु असून ८४ दश लक्ष घनमीटर एवढी क्षमता असलेल्या प्रकल्पाला एकुण १८ दरवाजे आहेत मात्र २००६ नंतर म्हणजेच १६ वर्षा नंतर यंदा अकरा दरवाचे उघडण्यात आले आहेत.

मुसळधार पावसामुळे सोळा वर्षांनंतर उघडले विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे
धक्कादायक! होणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच जवानाने केली आत्महत्या

संपुर्ण राज्यातच पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानुसार काही भागांमध्ये या पावसाला सुरुवात देखील झाली आहे. बैलपोळ्यापासूनच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला होता तर परभणीमध्ये काही बैलही वाहून गेले होते तर कुठे गाड्या अडकल्या होत्या तसेच आज बीड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसामुळे जवळपास 25 गावांचा संपर्क तुटला तर कपिलधार धबधब्यापासून 2 तरुण वाहून गेल्याची माहितीही समोर येत आहे.

Edited By - jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com