TET Exam : बीड जिल्ह्यात 12 हजार 447 परिक्षार्थी देणार टीईटी परीक्षा!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी, बीड जिल्ह्यातील 12 हजार 447 परिक्षार्थी बसणार आहेत.
TET Exam : बीड जिल्ह्यात 12 हजार 447 परिक्षार्थी देणार टीईटी परीक्षा!
TET Exam : बीड जिल्ह्यात 12 हजार 447 परिक्षार्थी देणार टीईटी परीक्षा!विनोद जिरे

बीड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी, बीड जिल्ह्यातील 12 हजार 447 परिक्षार्थी बसणार आहेत. जिल्ह्यात दोन सत्रात परीक्षा होत आहेत, यासाठी सकाळी 20 आणि दुपारी 16 परीक्षा केंद्र नेमण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. टीईटी आणि नेट एकाच दिवशी आल्याने काही परिक्षार्थीचा गोंधळ उडाला आहे. एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

हे देखील पहा :

सध्या परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी असून प्रत्येक विद्यार्थ्याला चेक करूनचं सोडलं जात आहे. परीक्षा सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज आहे. पहिल्या पेपरसाठी 7 हजार 45 व दुसऱ्या पेपरसाठी 5 हजार 402 परीक्षार्थी बसणार आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी दिली आहे.

TET Exam : बीड जिल्ह्यात 12 हजार 447 परिक्षार्थी देणार टीईटी परीक्षा!
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदानाला सुरुवात; मविआ भाजपामध्ये काट्याची लढत
TET Exam : बीड जिल्ह्यात 12 हजार 447 परिक्षार्थी देणार टीईटी परीक्षा!
लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेवर दोन वर्ष जबरदस्ती बलात्कार!

परीक्षा सकाळी 10:30 ते 1:00 व दुपारी 2 ते 4:30 यावेळेत होणार आहेत. परिक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून त्या त्या शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या पेपरसाठी 5 व दुसऱ्या पेपरसाठी 4 झोन असून नायब तहसीलदार झोनल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी अधिकारी परिश्रम घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com