रेशनच्या धान्यासह १३ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त; हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातुन जाणाऱ्या हिंगोली ते वाशिम मार्गावर बुधवार (ता. सात) रात्री दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पिकअप ( एमएच ४० सीडी ११७४) यात नायलॉनच्या ७० थैल्यात रेशनचा तांदूळ
रेशनच्या धान्यासह १३ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त; हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
हिंगोलीत रेशनचे धान्य जप्त

हिंगोली : हिंगोली ते वाशिम मार्गावर काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या राशनच्या धान्यासह १३ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन एकाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातुन जाणाऱ्या हिंगोली ते वाशिम मार्गावर बुधवार (ता. सात) रात्री दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पिकअप ( एमएच ४० सीडी ११७४) यात नायलॉनच्या ७० थैल्यात रेशनचा तांदूळ त्याचे वजन ३४. ५ क्विंटल किमत ६९ हजार तर अकरा थैल्यात ५. ५ क्विंटल गहू त्याची किमत ११ हजार असा वाहनासह सहा लाख ८० हजाराचा माल जप्त केला.

हेही वाचा -

सहा लाख रुपये किमतीचा पिकअप (एमएच ३७ टी १६६४) यात ७७ थैल्यात रेशनचा ३८ क्विंटल गहू त्याची अंदाजे किमंत ७६ हजार रुपये असा सहा लाख ७६ हजार असा सर्व एकूण १३ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन चालक अरबाज असीमखान रा. पलटन, हिंगोली व कैलास पेशकलवाड रा. पेनटाकळी जि. वाशिम यांच्या ताब्यातील पिकअपमध्ये गोरगरिबांना शिधापत्रिकेवर मिळणारा स्वस्त धान्य दुकानातील राशनचा गहू व तांदूळ अवैधरित्या काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना आढळून आले. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या फिर्यादीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com