बीड हादरलं! 13 वर्षीय बालविवाहितेवर नवरा, जन्मदात्यासह 400 जणांकडून बलात्कार

नवरा ,बाप आणि बलात्काऱ्यावर गुन्हा दाखल, बीडमधील अल्पवयीन पीडितेची आपबीती
बीड हादरलं! 13 वर्षीय बालविवाहितेवर नवरा, जन्मदात्यासह 400 जणांकडून बलात्कार
बीड हादरलं! 13 वर्षीय बालविवाहितेवर नवरा, जन्मदात्यासह 400 जणांकडून बलात्कारSaam Tv

विनोद जिरे

बीड: 8 वर्षाची असताना तिची आई मरण पावली, वडिलांनी १३ व्या वर्षीच बालविवाह लावून दिला. विवाहानंतर Marriage पतीच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून माहेर गाठलं. तर वडिलांकडून लैंगिक छळ होऊ लागला. म्हणून घर सोडल तर जेवण देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या अंबेजोगाई शहरात घडली आहे. या अल्पवयीन पिडीतेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून मन सुन्न होईल. रस्त्यावर अनेकांनी शरीराचे लचके तोडले. त्यात लॉजवर पोलिसांनी पकडलं तर त्यानी देखील अत्याचार केल्याची आपबीती पीडितेने सांगितली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार करणारे 2 आरोपी, पती, वडील, चुलते, भाऊ, नंनद यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीचा अल्पवयीन विवाह केल्याप्रकरणी, तिच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

बालकल्याण समितीकडून धक्कादायक खुलासे;

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातील महिन्यात 60 पोस्कोचे गुन्हे दाखल होत आहेत. अंबाजोगाई मधील प्रकार अत्यंत गंभीर असून अल्पवयीन पीडित मुलगी बालकल्याण समितीकडे आलेले आहे. तिची तपासणी केली असून ती 20 आठवड्याची गर्भवती आहे. तिच्यावर पाच ते सहा महिन्यांत पैशाचे, जेवणाचे आमिष दाखवून 400 ते 500 लोकांनी अत्याचार केला आहे . यात 2 पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत, हे धक्कादायक आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे. मात्र सुज्ञ नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ अभय वणवे यांनी केले आहे.

जेवण देण्याचे आमिष दाखवून दोघांनी बलात्कार;

पतीच्या आणि माहेरी वडिलांच्या लैंगिक छळाला कंटाळून, घर सोडून अंबाजोगाई शहरात मोरेवाडी बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन विवाहितेस, जेवण देण्याचे आमिष दाखवून दोघांनी बलात्कार केला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील अल्पवयीन विवाहिता सासरी व माहेरी होणारा छळ व लैंगिक शोषण याला कंटाळून मोरेवारी परिसरात असलेल्या बसस्थानक परिसरात भिक्षा मागुन उपजीविका करत होती. १५ दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहरातील ज्ञानदीप अकॅडमीतील हरी दराडे व ऋषीकेश दत्तात्रय सांगळे यांनी पीडित मुलीस तुला जेवायला देतोत, म्हणून आडस रोडवर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणानंतर अत्याचाराला वाचा फुटली.

...तर माहेरी वडीलांनी देखील लैंगिक छळ सुरू केला;

अल्पवयीन मुलीची आई ही 8 वर्षाची असतानाच मृत्यू पावली. त्यानंतर पीडितेचे शिक्षण सोडून तिच्या वडिलांनी तिचे वयाच्या 13 व्या वर्षी लग्न लावून दिले. पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे सतत मानसिक त्रास व शारीरिक त्रास देत असल्यामुळे घर सोडून माहेरी राहायला आली. तर माहेरी वडीलांनी देखील लैंगिक छळ सुरू केला. म्हणून घरदार सोडून अंबाजोगाईतील मोरेवाडीच्या बसस्थानक परिसरात, भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून ऋषिकेश दत्तात्रय सांगळे, हरी दराडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. तर बालविवाह केल्याप्रकरणी कुटुंबातील सहाजण व विवाह लावणाऱ्या पुरोहित यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड हादरलं! 13 वर्षीय बालविवाहितेवर नवरा, जन्मदात्यासह 400 जणांकडून बलात्कार
Latur: वैद्यकीय महाविद्यालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग!

बीडमधील अल्पवयीन पीडितेची आपबीती;

अंबाजोगाई तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर फुटपाथवर जिवण जगण्याची वेळ आली आहे. अनेकांनी तिच्यावर अत्याचार करुन शरीराचे लचके तोडले आहेत. अल्पवयीन मुलीने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझे वडील व माझा भाऊ तालुक्यातील गावात रहातो. माझी आई मी 8 वर्षाची असताना मयत झालेली आहे. माझे 5-7 वी पर्यंतचे शिक्षण वसुंधरा प्राथमिक विदयालय चनई येथे शिक्षण झाले. तेव्हा मी सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह चनई येथे राहत होते. 7 वी नंतर मला माझे वडीलांनी माझे गावी नेले. त्यानंतर लगेच अंदाजे 19.5.2018 रोजी, मी 13 वर्षाची असताना माझ्या वडीलांनी माझे बळजबरीने विशाल भागवत सोमवंशी (वय -33 वर्षे रा - धारुर ता.जि - बीड) याच्याशी घाटनांदुर ता - अंबाजोगाई येथे लग्न लावले. माझ्या लग्नाला माझा नवरा विशाल भागवत सोमवंशी, नणंद सोनाली सुरवसे, तसेच माझे वडील अशोक सोळंके, भाऊ सुरज अशोक सोळंके तसेच माझा मोठा चुलता रामचंद्र, लहान चुलती राणी सुरेश सोळंके व घाटनांदुर येथील ब्राम्हण व इतर काही लोक लग्नाला हजर होते .

लग्नानंतर मी, माझी आजी सासु असे अंबाजोगाई येथे राहत होतो. त्यावेळी माझा नवरा धारुर येथे कामाला जात होता व माझा नवरा अधुनमधुन धारुर वरुन येत असे. तेव्हा आमच्यात शारिरीक संबंध येत होते. माझा नवरा अधुनमधुन मला हाताच्या चापटीने मारहाण देखील करत होता. म्हणुन मी 14 जानेवारी 2019 रोजी रागाने माझे माहेरी आले व तेथेच वडील व भाऊ यांच्याबरोबर राहु लागले .

मी माहेरी राहत असताना माझे वडील मला म्हणत असे की, तु तुझा नवरा सोडुन आमच्याकडे का राहायला आलीस. "नवरा नको वाटतो तर ये माझे जवळ"असे म्हणुन लैंगिक संबंधासाठी माझे शरीराला स्पर्श करीत होते. हाताच्या चापटीने मारहाण देखील करत होते. म्हणुन त्यांना कंटाळुन मी घरातुन निघुन अंदाजे जुन 2021 पासुन अंबाजोगाई येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बसस्टॉपवर राहत आहे. व भीक मागून उपजिवीका भागवत आहे.

मी एकटी राहते याचा गैर फायदा घेऊन अंबाजोगाई येथील ज्ञानदीप अँकडमी येथील हरी व ऋषी यांनी 15 दिवसापुर्वी जेवायला देतो, असे म्हणुन आडस रोडला मोकळ्या जागेत माझेवर दोघांनी मिळुन बळजबरीने बलात्कार केला. आरोपी हरी दराडे रा. गावदंरा ता धारूर व ऋषीकेस दत्तात्रय सांगळे रा. चाडगाव ता. धारूर यांनी माझेवर बलात्कार केला म्हणुन मी ग्रामीण पोलिस ठाणे अंबाजोगाई येथे येवुन कायदेशीर तक्रार दिली आहे.

या अल्पवयीन मुलीची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, मानवलोक मनस्विनी प्रकल्पचे बालाजी वाघमारे, शोभा किरवले यांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मँडम यांना भेटले. यावेळी मुलीची आपबीती ऐकून तिला धिर देत, तात्काळ सुत्रे हलवत, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावयास लावून योग्य दिशेने तपास करावा, अशा सुचना केल्या. या गुन्हयाचा तपास पिंक पथक प्रमुख महिला पो.उपनिरीक्षक व्हि.पी.पेठकर यांनी यातील एक आरोपी ऋषीकेस दत्तात्रय सांगळे यास ज्ञानदिप अँकडमी येथून अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणी जर एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असा इशारा पोलीस अधीक्षक आर राजास्वामी यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com