Reliance Jewels च्या दराेड्याप्रकरणी एसपी बसवराज तेलींची महत्त्वपूर्ण माहिती; 14 काेटींची लूट, पाेलिसांच्या...

Sangli Reliance Jewels Robbery Case: पाेलिसांची पथके दरोडेखोरांच्या मागावर आहेत.
Reliance Jewels sangli, SP Basavraj Teli
Reliance Jewels sangli, SP Basavraj Telisaam tv

Sangli Crime News : सांगली-मिरज रस्त्यावर असणा-या रिलायन्स ज्वेलस (reliance jewels) या सोने चांदीच्या शोरूमवर रविवारी दुपारच्या सुमारास दरोडा पडला हाेता. या दराेडेखाेरांनी एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. संबंधित टाेळीला लवकर लवकर जेरबंद करु असा विश्वास पोलीस अधीक्षक बसवराज तेली (SP Basavraj Teli) यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

Reliance Jewels sangli, SP Basavraj Teli
Mission Admission : अकरावी प्रवेशासाठी आठ जूनपासून भरावे लागणार पसंतीक्रम; जाणून घ्या वेळापत्रक

सांगली -मिरज रस्त्यावरील रिलायन्सच्या शोरूममध्ये रविवारी भरदुपारी फिल्मी स्टाईलने सशस्त्र दरोडा टाकणारे दरोडेखोर हे पोलिस बनून ग्राहक म्हणून शाेरुममध्ये गेल्याचे पाेलिस तपासात समोर आले आहे. त्याशिवाय हे दरोडेखोर परजिल्ह्यातील आणि सराईत असून रेकी करूनच त्यांनी दरोडा टाकल्याची चर्चा सुरु आहे.

पोलिसांच्या पेहरावाप्रमाणे असलेलेले संशयितांचे छायाचित्रण सीसीटीव्हीतून समोर आले आहे. या संशयितांचे धागेदोरे अद्याप मात्र पाेलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र ज्या गाडीतून संशयित आरोपी आले होते. ती गाडी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या गाडीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत.

Reliance Jewels sangli, SP Basavraj Teli
Satara Crime News : दारूच्या नशेत तर्रर्र... मुख्यालयातील पाेलिस निरीक्षकाला पब्लिकने बेदम चाेपला, व्हिडिओ व्हायरल झाला ना भाऊ

या दरोड्यामध्ये जवळपास ८० टक्के दागिने चोरट्यानी लांबवले आहेत. या सशस्त्र दरोडाच्या घटनेनंतर रिलायन्स शोरूमचे मुंबई, पुण्याचे काही वरिष्ठ सांगलीत आज (साेमवार) सांगली येथील शोरूम मध्ये दाखल झाले आहेत.

Reliance Jewels sangli, SP Basavraj Teli
Nagar News : भाविकांनाे ! नगर शहरातील 16 मंदिरात 'ड्रेस कोड' लागू

14 काेटींचा मुद्देमाल लंपास

दरम्यान पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या माहितीनूसार या सशस्त्र दरोडामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. आहे. ही टोळी परराज्यातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांगली पोलीस दलासह अन्य पोलीस दलाच्या मदतीने दराेड्याचा तपास सुरु आहे. पाेलिसांची पथके दरोडेखोरांच्या मागावर आहेत. या टाेळीला लवकरात लवकर जेरबंद केले जाईल असा विश्वास एसपी तेली यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com