बीड: दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी छापा मारल्यानंतर, आता परळी शहरातील एका मटका बुकीवर देखील छापा मारला आहे. यामध्ये 20 जणांना ताब्यात घेत तब्बल 114 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त बातमीदाराफार्मात मिळालेल्या माहितीनुसार स्वतः सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पथकासह परळी शहरातील हनुमान नगर भागात गेले. त्याठिकाणी शिवाजी जाधव यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका बुकीवर छापा मारला.
हे देखील पहा -
यात विलास पावडे, सुरेश तरडे, बालासाहेब मुंडे, संतोष साळुंके, राम बदने, प्रल्हाद काळे, प्रेमचंद आव्हाड यांच्यासह 20 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत मटका जुगाराच्या साहित्य, मोबाईल असा एकूण 1 लाख 13 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या कारवाईने परळीसह जिल्ह्यातील अवैध धंदा चालवणाऱ्या माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.