संतापजनक! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाचा घरामागे अत्याचार

अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संतापजनक! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाचा घरामागे अत्याचार
पाच मित्रांचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार Saam tv

अमरावती - जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी उर्फ दिवाकर कराळे असं या आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराबाहेर निघाली होती. त्याचवेळी नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून घरामागील जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

हे देखील पहा -

रात्री बराच वेळ होऊनही मुलगी घरी आली नाही त्यामुळे तिच्या आईने शोध घेतला असता मुलगी घरामागे रडत असताना दिसली. आईने मुलीची विचारपुस केली तेव्हा मुलीने आपबिती सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. मुलीच्या आईने त्वरीत खोलापूर पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दिली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी हरी उर्फ दिवाकर कराळे याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात खोलापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने मात्र गावत खळबळ माजली आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com