वसमत येथील एलबीएसच्या १७ विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक

बीडीएस परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गातील एकूण १७ विद्यार्थ्यांनी
वसमत येथील एलबीएसच्या १७ विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक
वसमतमधील हीच ती एलबीएस शाळा

संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान असणा-या लालबहादूर शास्त्री विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी बिडीएस परिक्षेत यश मिळवून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहेत.

बीडीएस परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गातील एकूण १७ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहेत. यात सुवर्ण पदक- 6, रौप्य पदक- 5, कांस्यपदक- 6 पदके जिंकून विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

हेही वाचा - नांदेड परिक्षेत्रांतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. या चारही जिल्ह्यात मटका, गुटखा, गांजा (एनडीपीएस) आणि दारु असे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत.

शाळेतील हे आहेत गुणवंत विद्यार्थी

इयत्ता दुसरीतील वैष्णवी बोडेवार ९२ गुण (रौप्यपदक), इयत्ता तिसरीची आरुषी सवंडकर ९६ गुण (सुवर्णपदक), श्रेया पोटे ९३ गुण (रौप्यपदक), प्रथमेश भोंग ९१ गुण (रौप्यपदक), अपूर्वा मदीलवार ८८ गुण (कांस्यपदक), वेद फुलवरे ९० गुण ( कांस्यपदक), वैष्णवी शिंदे ८४ गुण (कांस्यपदक), जितेश ढाकरे ८६ गुण (कांस्यपदक), आदिती गोरे ९३ गुण ( कांस्यपदक ), इयत्ता चौथीमधील हर्षद असोले ९९ गुण (सुवर्णपदक), संस्कृती बोडेवार ९२ गुण (सुवर्णपदक), आसना घोडके ८९ गुण (सुवर्णपदक), कोमल बाबुळगावकर ८८ ( सुवर्णपदक ), आरुष कोंडामंगले ८७ ( सुवर्णपदक ), इयत्ता सहावीमधील

श्रीनिवास अग्रवाल ८१ गुण ( रौप्यपदक ), ईशान पवार ८० गुण ( रौप्यपदक ), इयत्ता सातवीमधील स्मितल कासलवार ७६ गुण ( कांस्यपदक ) यांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्रीमती पवार , श्रीमती खांडेगावकर, श्री माखणे, श्री आझादे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. एलबीएस

विद्यालयाचे संचालक संदीप चव्हाण, मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण व सर्व संचालक व शिक्षकांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com