Breaking Nanded : नांदेडमध्ये भरदिवसा 17 वर्षाच्या युवकाचा भोसकून खून! पहा VIDEO
Breaking Nanded : नांदेडमध्ये भरदिवसा 17 वर्षाच्या युवकाचा भोसकून खून!संतोष जोशी

Breaking Nanded : नांदेडमध्ये भरदिवसा 17 वर्षाच्या युवकाचा भोसकून खून! पहा VIDEO

नांदेडमध्ये भरदिवसा एका 17 वर्षाच्या युवकाचा अत्यंत निर्दयीपणे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे. तर एक युवक या घटनेत जखमी झाला आहे.

नांदेड : नांदेडमध्ये भरदिवसा एका 17 वर्षाच्या युवकाचा अत्यंत निर्दयीपणे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे. तर एक युवक या घटनेत जखमी झाला आहे. ही घटना आज हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरात खळबळजनक घडली आहे. यश मिरासे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून खून करुन आरोपी फरारी झाले.

हे देखील पहा :

खूनाच्या या घटनेमुळे हिमायतनगरमध्ये दहशतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांना जमलेली गर्दी पांगविण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. सदर खूनाची घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेतील जखमी युवकावर हिमायतनगर च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Breaking Nanded : नांदेडमध्ये भरदिवसा 17 वर्षाच्या युवकाचा भोसकून खून!
OBC Reservation | ...तर अध्यादेश काढावा लागेल : मुनगंटीवार

या हत्याकांडाचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका मृताच्या कुटूंबियांनी घेतली आहे. दरम्यान, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घटनास्थळावर भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com