१७ वर्षे अत्याचार, खोलीत कोंडलं; ५ वर्षांनी बाहेरचं जग बघणाऱ्या पत्नीची दुर्दैवी कहाणी

Beed Latest News: बीड शहरातील रूपाली किन्हिकर या महिलेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून आणि पाहून अक्षरशः पायाखालची जमीन सरकली.
The unfortunate story of a wife who sees the outside world after 5 years From Beed
The unfortunate story of a wife who sees the outside world after 5 years From Beedविनोद जिरे

बीड: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार, बीड (Beed) शहरातील जालना रोड परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिलेला मारहाण देखील केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं हे देखील दहशतीखाली आहेत. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केलीय. यावेळी त्या महिलेची अवस्था पाहून अक्षरशः सामाजिक कार्यकर्त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले. गेल्या 15 वर्षापासून हा अमानुष अत्याचार (Inhuman atrocities) आणि नरक यातना भोगणाऱ्या पीडतेची व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. (17 years of torture, locked in a room; The unfortunate story of a wife who sees the outside world after 5 years)

हे देखील पहा -

बीड शहरातील रूपाली किन्हिकर या महिलेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून आणि पाहून कुणाच्याही पायाखालची अक्षरशः जमीन सरकेल. बीड शहरातील जालना रोडशेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर, या महिलेचा 20 वर्षांपूर्वी गडगंज श्रीमंत असलेल्या घरांमध्ये विवाह झाला. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन-तीन वर्ष आनंदात गेले. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. एका दुकानावर कामाला जात होती, मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झालं. गेल्या 17 वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत, संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते, त्यानंतर आज बाहेर निघाले आहे, माझी मुलं आहेत, मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण देखील करत असल्याचं पीडित महिलेने सांगितले. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

घराच्या बाहेरही निघू देत नव्हता, एवढेच नाही तर वडील मरण पावले तर अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही. पोटच्या मुलांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास देत असून हा माणूस नाही हा हैवान आहे. याने जिवंत महिलेला कोंडून ठेवलं, हे आम्ही गेल्या 10 वर्षांपासुन पाहतोय. खूप सुंदर असलेली महिला आज 80 वर्षांची दिसतेय असं शेजाऱ्यानी सांगितलं.

रुपाली दिसायला सुंदर असल्यामुळे तिचा नवरा तिच्यावर संशय घेत असून गेल्या 17 वर्षांपासून तिला मारहाण करत घरात डांबून ठेवले. मागच्या चार-पाच वर्षांपूर्वी तुला बाहेर काढायचं आहे असं म्हणत मी फोन केला होता, मात्र तिला धमकी दिल्यामुळे पुन्हा त्रास सुरू झाला. रूपालीच्या अंगावरती जखमा आहेत, महिलेला चालता येत नाही, त्यामुळे त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड संगीता धसे यांनी केली.

The unfortunate story of a wife who sees the outside world after 5 years From Beed
बहिणीस पळवून नेल्याच्या रागातून युवकास मारहाण; भावांवर खूनाचा गुन्हा दाखल

शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी सामान्य माणूस पाच मिनिटे देखील, वासाने थांबू शकणार नाही. अशा ठिकाणी पीडित महिला व तिची दोन मुलं राहत होती. त्यांची आम्ही सुटका केली असून पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल आहे असं पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी सांगितलं. दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केल्यास करण्याची प्रक्रिया केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात आज देखील महिलावरील अत्याचार कमी होत नाहीत. तर पती कडूनच नरक यातना दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, खरंच माणुसकी जिवंत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या नराधमास कठोर शिक्षा केली जावी. अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com