साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी

कोव्हिडंच्या लसीकरणाच्यासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालया बाहेर काल रात्री नंबर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी
साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दीओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : कोव्हिडंच्या Covid लसीकरणाच्यासाठी सातारा Satara जिल्हा शासकीय रुग्णालया बाहेर काल रात्री नंबर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरवात 1 तारखेपासून होणार असल्याने ही गर्दी उसळली होती. Large crowds at night for vaccinations in the age group of 18 to 44 in Satara

आज 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना फक्त 200 डोस उपलब्ध झाले होते आणि इतर 250 असे एकूण फक्त 400 डोस उपलब्ध झाले होते. या साठी सकाळी 7 वाजता लसीकरण सुरू होणार असल्याने रात्री पासूनच जवळपास 200 लोकांची गर्दी या लसीकरण केंद्रावर Vaccination Center झाल्याने गोंधळ उडाला.

हे देखील पहा-

अखेर गर्दी हटवण्यासाठी पोलीस Police रुग्णालय परिसरात दाखल  झाले होते. त्यावेळी पोलीस आणि लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये वादावादी देखील झाली. सातारा जिल्ह्यात नेहमीच लसीच्या उपलब्धते वरून प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. नेहमीच कमी लस उपलब्ध झाल्याने बऱ्याच वेळा लसीकरण केंद्रांवर गोंधळ झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक रात्रभर लसीकरण केंद्रावर नंबर लावण्यासाठी धडपडत असताना बघायला मिळत आहेत.

साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी
हाजी अरफात शेख यांना भाजप सोडण्याची धमकी

सकाळी 7 वाजता लस मिळण्याचे कुपन वाटणार असतानाही रात्री पासून नागरिकांनी केंद्रावर गर्दी केल्याने एका लसी साठी नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळाले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com