मराठवाड्यातील रस्ते बनवणाऱ्या 18 कंपन्या फेलच; अशोक चव्हाणांची जाहीर कबुली

मात्र कोरोनाचे बंधन असल्यामुळे छोटेखानी कार्यक्रम घेतला त्यामुळे सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळले तर लॉकडाऊन (Lockdown) पडणार नाही.
मराठवाड्यातील रस्ते बनवणाऱ्या 18 कंपन्या फेलच; अशोक चव्हाणांची जाहीर कबुली
ashok chavanSaam TV

परभणी : मराठवाड्यातील रस्ते तयार करणाऱ्या अठरा एजन्सीज फेल झाल्या आहेत हे मान्यच करावे लागेल. आणि त्यामुळेच मराठवाड्याच्या रस्त्यांच्या बांधकामाची गती संथ सुरू आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मान्य केलं आहे. चव्हाण हे गंगाखेड येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर माध्यमांशी बोलत होते. जनतेने कोरोनाचे (Corona) नियम पाळले तर लॉकडाऊन लावायची वेळ येणार नाही. त्यामुळे जनतेने कोरोनाचे नियम पाळावे. आज उद्घाटनाच्या वेळी मी स्वतः छोटेखानी कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम मी मोठा घेऊ शकलो असतो. मात्र कोरोनाचे बंधन असल्यामुळे छोटेखानी कार्यक्रम घेतला त्यामुळे सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळले तर लॉकडाऊन (Lockdown) पडणार नाही.

ashok chavan
पुर्णा तालुका हळहळला; नवविवाहीत पती- पत्नीची विष पिऊन आत्महत्या, कारण...

ओबीसी आरक्षणाबाबत बोलतांना चव्हाण यांनी केंद्राकडे बोट दाखवले. केंद्र सरकारने आम्हाला जर एम्पिरिकल डेटा दिला असता तर ओबीसी आरक्षणासाठी फायद्याचा ठरला असता. मात्र केंद्राकडून आम्हाला डेटा मिळाला नाही आणि त्यामुळे आता एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे. जो पर्यंत इमपीरिकल डेटा उपलब्ध होत नाही तो पर्यंत स्थिती स्पष्ट होणार नाही. अस वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे. (Ashok Chavan Latest News In Marathi)

दरम्यान काल यवतमाळच्या रोडचं खरं रुप दाखवणारा एक व्हिडिओ सोशियल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्यानंतर साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत अशोक चव्हाणांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आज सकाळीच रोड बनवणाऱ्या अभियंत्याला नोटीस देवून संपुर्ण रस्ता पुन्हा बनवण्यासाठी सांगण्यात आले आहे. आज त्याच अनुषंगाने अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातील रस्त्यांची दुरावस्था का आहे हे सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com