Virar News: धक्कादायक! विरारमध्ये दुर्दैवी घटना, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

विरार येथील एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Virar News
Virar NewsSaam tv

Virar News: विरारमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. विरार येथील एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 19 एप्रिलला सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

विरारच्या झितिज रिसॉर्टमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेतील १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने रिसॉर्टमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Virar News
Pune Accident News: नवले पुलावरील भय संपेना!; अपघातांचं सत्र सुरुच, आजही दोन अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथे रहाणारा हलकी कल्लापा पवार हा 18 वर्षीय तरुण विरारच्या अर्नाळा भागातील क्षितिज रिसॉर्टमध्ये गेला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास तो पोहोण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उतरला. मात्र तो पाण्यात बुडाला.

यावेळी आसपास अनेकजण स्विमिंग पूलमध्ये पोहोत होता. परंतु हलकी पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. रिसॉर्टमधील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हलकीला नजीकच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. विरार पोलीस पुढील तपास करत आहेत .

Virar News
Ratnagiri Lote MIDC Fire News : लोटे एमआयडीसीत आगीच्या घटना वाढल्या; कंपन्यांची सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी

वसई-विरारमध्ये वाहन मालकांना गंडा; एका महाठगाला अटक

नालासोपारा वसई विरार शहरातील खाजगी व ट्रान्सपोर्टची वाहने भाड्याने देण्याचे आमिष दाखवून अनेक गाड्या मालकांना गंडा घालणाऱ्या एका महाठगाला विरार पोलिसांनी अटक केली आहे...

मोहोम्मद मुस्तफा उद्दीन असं यां ठगाचे नाव असून त्याने आजपर्यंत अनेक गाडी मालकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. हा आरोपी ट्रान्सपोर्ट टेम्पो, आयशर ट्रक व कार एका ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या नावाने करार करून गाडी मालकांकडून घ्यायचा.

त्यानंतर महिन्याचे भाडे द्यायची वेळ आली की, ते पैसे स्वतः वापरून तो ऐशोआराम करत होता. कोणाचे 2 लाख तर कोणाचे पाच लाख असे अनेक महिन्यांचे भाडे थकवून त्याने वाहनधारकांची फसवणूक केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com