अहमदनगर 8 वी ते 12 वी: 2045 शाळांपैकी 183 शाळा सुरू

शालेय शिक्षण विभागाने कोरोना मुक्त भागात आज पासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्या नंतर अहमदनगर जिल्ह्यातील २०४५ शाळांपैकी १८३ शाळा सुरू झाल्या आहेत.
अहमदनगर 8 वी ते 12 वी: 2045 शाळांपैकी 183 शाळा सुरू
अहमदनगर 8 वी ते 12 वी: 2045 शाळांपैकी 183 शाळा सुरूSaam Tv

सचिन आगरवाल

अहमदनगर : शालेय शिक्षण विभागाने कोरोना Corona मुक्त भागात आज पासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्या नंतर अहमदनगर Ahmadnagar जिल्ह्यातील २०४५ शाळांपैकी १८३ शाळा सुरू झाल्या आहेत.

कोरोना मुळे गेली २ वर्ष शाळा बंद होत्या. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेकषणानुसार शाळेत विद्यार्थ्यांना पाठविन्यासाठी पालकांनी संमती दर्शवली असल्याने माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यात २०४५ या माध्यमिक शाळा आहेत त्यापैकी आज १८३ शाळा या सुरू झाल्या आहेत. त्या शाळा सुरू करताना शासनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करा असे लेखी आदेश दिल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.

हे देखील पहा-

शासनाच्या नियमानुसार Rules सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती, मुख्याध्यापक सर्वांनी विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ५०% क्षमतेने शाळा सुरू करत असल्याचं सरपंच यांनी सांगितले.

शाळा Schools सुरू झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १५ जून ला सुरू होणाऱ्या शाळा एक महिन्याने का होईना सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. ५० % क्षमतेने आज शाळा सुरू झाल्या आहेत . वाळुंज या गावात एक दिवस मुली तर एक दिवस मुले शाळेत येणार असल्याचं शिक्षक सांगतात.

अहमदनगर 8 वी ते 12 वी: 2045 शाळांपैकी 183 शाळा सुरू
भारतीय संघाच्या चिंतेत वाढ; आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन शाळा Online Schools सुरू असताना काहीना रेंजचा प्रॉब्लेम होता तर काहीना घरचे बाहेर जात असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत होत्या परंतु आज शाळा सुरू झाल्याने खूप आनंद होत असल्याच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एकंदरीतच आज पासून माध्यमिक शाळा काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजुन ही काही शाळा सुरू नाहीत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केल्याने पालकासह शिक्षकानं मध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे. हळू हळू का होईना शासनाचे सर्व नियमांचे पालन करून लवकर इतरही वर्ग सुरू व्हावे आणि पहिल्या सारख्या पूर्ण क्षमतेने शाळा सुरू व्हाव्यात असे प्रत्येक पालक विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील वाटते यात शंका नाही.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com