बीड जिल्ह्यात विविध अपघातात 2 जण जागीच ठार, तर 4 जण गंभीर जखमी...

बीड जिल्ह्यात काल सायंकाळनंतर झालेल्या विविध दोन अपघातात, 2 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
बीड जिल्ह्यात विविध अपघातात 2 जण जागीच ठार, तर 4 जण गंभीर जखमी...
बीड जिल्ह्यात विविध अपघातात 2 जण जागीच ठार, तर 4 जण गंभीर जखमी...विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यात काल सायंकाळनंतर झालेल्या विविध दोन अपघातात, 2 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. बीड-सोलापूर महामार्गावरील कोळगाव जवळ दुचाकीला कारने जोराची धडक दिल्याने कपिलधार येथे देवदर्शनासाठी आलेल्या दुचाकीस्वार भाविकाचा जागीच मृत्यू झालाय. तर कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर सुदाम सरकाळे वय 35 जि. जालना असं मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

(2 killed on the spot, 4 seriously injured in various accidents in Beed district)

हे देखील पहा -

तर दुसरा अपघात, अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सेलूअंबाजवळ झाला असून ऊसाच्या ट्राॅलीवर कार धडकल्याने, कारमधील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कमलाकर श्रीपतराव लोखंडे वय 45, रा. लातूर असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव असून विष्णू विश्वनाथ वाघमारे रा. सुगाव , ता . रेणापूर , जि . लातूर असे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी बीड ग्रामीण व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com