
औरंगाबाद - पावसाळा सुरू होताच औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात पावसासोबतच विजांचा तांडव पाहायला मिळत आहे. शनिवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात एक महिला गंभीर जखमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पाऊस येत असल्यानं झाडाखाली थांबलेल्या दोन तरुणांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे देखील पाहा -
रोहनसिंग शिंदे आणि रवि कळसकर अशी त्यांची नावे आहेत. रोहनसिंग आणि रवी हे दोघे मित्र होते. तर दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील रोजवेपूर शिवारात वीज पडून एक म्हैस ठार झाली तर आणखी एका घटनेत बेलखेडा तांब्यात वीज पडून सात शेतमजूर जखमी झाले. बेलखेडा इथं शेतात काम करीत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस आला. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर जवळील लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले असता, जोरात विजेचा कडकडाट होऊन वीज झाडाला स्पर्श करून पुढे गेली.
यात विमलबाई राठोड, गीताबाई राठोड, कविता राठोड, सरलाबाई राठोड, सरलाबाई युवराज चव्हाण, शालिनी पवार, राजेंद्र पवार जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करणयात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात एक जण गंभीर जखमी आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.