रायगड जिल्ह्यात अडीच लाखांचे २० किलो अमली पदार्थ जप्त; पेण येथील आरोपीला अटक...

याची किंमत 2 लाख 49 हजार रुपये आहे. सुशील यास अटक केली असून पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात अडीच लाखांचे २० किलो अमली पदार्थ जप्त; पेण येथील आरोपीला अटक...
रायगड जिल्ह्यात अडीच लाखांचे २० किलो अमली पदार्थ जप्त; पेण येथील आरोपीला अटक... राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: रायगड जिल्ह्यात मादक द्रव्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना घडत असतात. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पेण येथून अडीच लाखाचा 20 किलो गांजा हस्तगत केला आहे. या गांजा (Drugs) प्रकरणी पेणमधील जोशी चाळ फणस डोंगरी येथून सुशील राजाराम पाटील वय 35 वर्ष यास अटक करण्यात आली आहे. पेण पोलीस ठाणे गु.र.न. 261/2021, NDPS ACT कलम 8(क ), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

रायगड (Raigad) स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून नववर्षाच्या अनुषंगाने 30 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पेण परिसरात पेट्रोलिंग सुरू होते. यादरम्यान पोह राजेश पाटील यांना पेण (Pen) शहरातील गणेश मंदिराचे समोरील बिल्डिंगचे मागे मोकळ्या जागेत, फणस डोंगरी, येथे एक इसम गांजा घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीला ताब्यात (Arrested) घेतले. सुशील पाटील असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याची तपासणी केली असता बॅगेत 20 किलो 740 ग्राम मादक नशाकारक गांजा सापडला.

रायगड जिल्ह्यात अडीच लाखांचे २० किलो अमली पदार्थ जप्त; पेण येथील आरोपीला अटक...
वसईत महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला स्थानिकांनी चोपला

याची किंमत 2 लाख 49 हजार रुपये आहे. सुशील यास अटक केली असून पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार ठाकूर, पोह राजेश पाटील, पोह झेमसे, पोह मोरे, पोह हंबीर, पोह सावंत, पोह चव्हाण, पोना म्हात्रे, पोशि लांबोटे या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com