New Year Party : बापरे! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी २० हजार जणांनी काढले मद्यप्राशन करण्याचे परवाने; महाराषट्रात दारू पिण्यासाठी आहेत हे नियम

हिंगोलीत तब्बल २० हजार हौशी मद्यपेयींनी मद्यप्राशन करण्याचा परवाना काढल्याची माहिती मिळाली आहे.
New Year Party
New Year PartySaam TV

New Year Party : नवीन वर्षाचे स्वगत प्रत्येक व्यक्ती मोठ्या धुमधडाक्यात करत असतो. काही व्यक्ती ऑफिसच्या मित्रांबरोबर तर काही जण कुटुंबीयांबरोबर नव वर्षाचे स्वागत करतात. यासाठी सर्वांचीच वेगळी प्लॅनिंग असते. गाण्यांच्या तालावर ताल धरत केक कापून अनेक व्यक्ती आधीच्या वर्षाचा निरोप घेतात. अशात ३१ डिसेंबरचा हा आनंद मद्यपेयी देखील मोठा धिंगाणा करत साजरा करतात. हिंगोलीत तब्बल २० हजार हौशी मद्यपेयींनी मद्यप्राशन करण्याचा परवाना काढल्याची माहिती मिळाली आहे. (Latest New year News)

३१ डिसेंबर रोजी आनंदाला कोणतेही विरझन नको या भावनेने त्यांनी परवाना घेतला आहे. एकूण २० हजार व्यक्तींकडे परवाना असल्याने ३१ डिसेंबरला २०२३ चे आगमन मोठ्या दणक्यात साजरे होणार असल्याचे दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, सेनगाव आणि हिंगोली या ठिकाणी मद्यप्रेमींनी ऑनलाईन परवाने काढून घेतले आहेत.

New Year Party
Health Tips for Pregnant Women : मद्यपान करणाऱ्या महिलांनो सावधान; गरोदरपणात मद्य पिण्याचे भयंकार परिणाम आले समोर

महाराष्ट्रात मद्यप्राशन करण्यासाठी काय आहे नियमावली?

महाराष्ट्रात (Maharashtra) सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा गुन्हा (Crime) मानला जातो. संबंधित व्यक्तीला अटक करून न्यायालयात हजर केले जाऊ शकते. यावर काय निर्णय घ्यायला हवा हे न्यायाधीश ठरवतात. या गुन्ह्यात शिक्षा किंवा जामीन निळतो. हॉटेल, परमिट, क्लब अशा ठिकाणी दारू विक्री आणि खरेदी परवाना दाखवून केली जाऊ शकते. राज्य उत्पादन शुल्क खात्यामार्फत हा परवाना मिळवता येतो. याचा कालावधी आजीवन, १ दिवस तसेच १ वर्षासाठी आहे.

New Year Party
Latur News: लातूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

फक्त ५ रुपयांत मिळतो दारू पिण्याता परवाना!

ज्या ठिकाणी मद्य विक्री केली जाते तेथून मद्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक दिवसांचे ५ रुपये आकारले जातात. तर एका वर्षासाठी ही फी १०० रुपये आणि आजिवनासाठी १००० रुपये भरावे लागतात. कोरोना काळापासून हे परवाने ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com