परळीत भाजप पक्षाला रामराम ठोकत 200 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शशिकांत वाईकर यांनी जवळ जवळ 200 कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे.
परळीत भाजप पक्षाला रामराम ठोकत 200 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
परळीत भाजप पक्षाला रामराम ठोकत 200 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशSaam tv

सातारा - भाजप BJP आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendra Raje Bhosale यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळी खोऱ्यातील शशिकांत वाईकर Shashikant Vaikarयांची ओळख आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून होती. या शशिकांत वाईकर यांनी जवळ जवळ 200 कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे. 

हे देखील पहा -

आ.शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भोंदवडे या गावात पार पडलेल्या मेळाव्यात हा प्रवेश घेण्यात आल्याने परळी भागातील राजकीय समीकरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रवेशामुळे आ.शिवेंद्रसिंहराजे यांची एक हाती सत्ता असणाऱ्या या भागात आता समोर शशिकांत वाईकर यांच्या सारखा तरुण चेहरा विरोधक म्हणून उभा राहिल्याने आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com