नाशिकमधील २१ मशिदींचा मोठा निर्णय; पहाटे भोंग्यावरुन अजान नाही

नाशिकमधील २१ मशिदींनी पहाटे ६ वाजेच्या आत भोंग्यावरुन अजान आणि बांग देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
Masjid Bhonga
Masjid BhongaSaam Tv

नाशिक: मनसेच्या (MNS) भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर मुंबईतील २६ मशिदींनी भोंग्याशिवाय अजानाचा निर्णय घेतला होता. आता यापर्श्वभूमीवर नाशिक मधील २१ मशिदींनीही मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील २१ मशिदींनी पहाटे ६ वाजेच्या आत भोंग्यावरुन अजान आणि बांग देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मशिदींच्या मौलवींनी भूमिका घेतली आहे.

मागिल काही दिवसांपासून भोंग्यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यातील अनेक मशिदींवरील भोंगे बंद करण्यात आले आहेत. नाशिकमधीलही (Nashik) २१ मशिदींनी हा निर्णय घेतला आहे. जुन्या नाशिकमधील बडी दर्गा, जहांगीर मशीद यासह एकूण २१ मशिदींच्या मौलवींनी एकमताने निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत भोंगे अथवा लाऊडस्पिकर (Loudspeaker) न लावण्याच्या आदेशाच पालन करत पहाटे ६ आधी भोंग्यांवरुन अजान दिली जाणार नाही, मात्र त्यानंतर दिवसभरातील अजान आवाजाच्या डेसिबल नियमांचे पालन करत लाऊस्पिकरवरून दिल्या जातील, अस मौलवींनी म्हटलं आहे.

Masjid Bhonga
किआन अमित ठाकरे! राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ जाणून घ्या...

मुंबईतील २६ मशिदींनी भोंग्याशिवाय अजान

मुंबईतील प्रसिद्ध सुन्नी बादी मस्जिद मदनपुरा आणि मिनारा मशिदीने भोंग्याशिवाय अजानचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणीही लाऊडस्पीकरशिवाय अजान दिली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या धर्मगुरूंनी बुधवारी उशिरा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आता सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय दिली जाईल. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असं यात म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्या मशिदींवरील भोंग्याच्या मुद्दयावरुन राज्य सरकारला इशारा दिला होता. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. भोंगे उतरले नाहीतर हनुमान चालीसा लावणार असल्याचा राज ठाकरे यांनी इशारा दिला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com