तीन महिन्यांत 22 घरफोड्यांचा उलगडा; तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त

अटकेतील आरोपींकडून तब्बल १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस (Police) ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तब्बल २२ घरफोड्यांचा छडा लावण्यात आला आहे. अटकेतील आरोपींकडून तब्बल १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीगनर, एमआयडीसी, गांधी चौक आणि लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यांसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसा घरफोड्या, जबरी चोऱ्या आणि इतर चोरीच्या घटना घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला विशेष सूचना केल्या. या गुन्ह्यांची उकल करण्याबाबत त्यांनी आदेश दिले.

Latur News
शरद पवार यांनी पुन्हा एकदा साधला काश्मीर फाइल्सवर निशाणा

गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात तैनात करण्यात आली. गुन्हेगारांची कुंडली शोधत असताना, काहींची माहिती हाती लागली. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची झाडाझडती घेतली असता, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एकूण २२ घरफोड्यांची उकल करण्यात आली. ७ जबरी चोऱ्या दरोड्यांचा तपास करण्यात यश आले आहे. तर, ११ इतर चोऱ्यांचा छड लावण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com