Accident : ट्राॅली उलटून २२ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी, पालकांनी संयम ठेवावा प्राचार्यांचे आवाहन (पाहा व्हिडिओ)

विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी दिली.
Amravati Accident News, Students
Amravati Accident News, Studentssaam tv

- अमर घटारे

Amravati Accident News : अमरावती (amravati) जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयातील (j d patil sangludkar mahavidyalaya daryapur) विद्यार्थ्यांचा दर्यापूर येथे येत असताना अपघात (accident) झाला आहे. या अपघातात २२ विद्यार्थी (students) जखमी (injured) झाले आहेत. (Breaking Marathi News)

Amravati Accident News, Students
Parbhani : इंग्रजी विषयाची कॉपी पूरविल्या प्रकरणी सहा शिक्षकांना न्यायालयात जामीन मंजूर

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते. या शिबीराचा शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना चक्क एका ट्रॅक्टर ट्रॉलीत बसवून दर्यापूर येथे आणले जात हाेते.

एका वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली. या घटनेत २२ विद्यार्थी जखमी झालेत. या ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाल्याचा अपघाताचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

Amravati Accident News, Students
Sailani Yatra : सैलानी यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज; बुलढाण्यासह अकोला, औरंगाबाद, जालना, जळगावातून अतिरिक्त बस

अगदी वळण रस्त्यावर हा ट्रॅक्टर वेगाने जात असताना ट्रॅक्टर पलटी झाला. सध्या अपघातातील दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या‎ देखरेखीखाली सर्वोतोपरी उपचार सुरू आहेत. त्यामुळे पालकांनी अफवांवर‎ विश्वास न ठेवता संयम ठेऊन महाविद्यालय प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com