लातुरात 228 पोलिसांना बढती प्राप्त
लातुरात 228 पोलिसांना बढती प्राप्तदीपक क्षीरसागर

लातुरात 228 पोलिसांना बढती प्राप्त

तब्बल 228 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

लातूर - जिल्हा पोलीस दला मधील 44 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती, 77 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार तर 107 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदी पदोन्नती अशा तब्बल 228 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे

बऱ्याच कालावधीपासून पोलीस अमलदारांची पदोन्नती प्रलंबित होती. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तब्बल 228 पोलीस अंमलदारांना पदोन्नती दिली आहे.

हे देखील पहा -

यामध्ये 44  पोलीस  हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 77 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती तर 107 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदोन्नती देण्यात आली आहे.पदोन्नतीतील आरक्षणा बाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे बऱ्याच कालावधीपासून या पदोन्नत  रखडल्या होत्या.

लातुरात 228 पोलिसांना बढती प्राप्त
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा

शासन निर्णयाप्रमाणे पोलीस अधीक्षक  यांनी पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या तब्बल 228 पोलीस अमलदारांना पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे लातूर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदोन्नती झालेल्या सर्व अमलदारांचे  अभिनंदन केले.भावी उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com