मतिमंद असल्याचा फायदा घेत मुलीवर अतिप्रसंग!

मतिमंद असल्याचा फायदा घेऊन एका 42 वर्षीय नराधमाने पीडित 23 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुरुड तालुक्यातील चोरडे गावात घडली आहे.
मतिमंद असल्याचा फायदा घेत मुलीवर अतिप्रसंग!
रायगडमध्ये 23 वर्षीय मतिमंद मुलीवर अतिप्रसंग ! राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : मतिमंद असल्याचा फायदा घेऊन एका 42 वर्षीय नराधमाने पीडित 23 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुरुड तालुक्यातील चोरडे गावात घडली आहे. 23-year-old mentally retarded girl physically abused in Raigad

हऱ्या उर्फ हरिश्चंद्र शेडगे (42) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपी शेडगे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक थोरात करीत आहेत.

हे देखील पहा-

मुरुड तालुक्यातील चोरडे गावात पीडित मतिमंद मुलगी ही आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेवण करण्याकरिता आणि आपल्या आईला पाणी आणण्यासाठी घरात आली होती. त्यावेळी आरोपी शेडगे याने पीडित मुलगी ही मतिमंद आहे हे माहीत असतानाही तिच्या मतिमंदाचा फायदा घेऊन घराच्या बाजूला असलेल्या बंद घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला.

रायगडमध्ये 23 वर्षीय मतिमंद मुलीवर अतिप्रसंग !
बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया

या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला. झालेला प्रकार पीडित मुलीने पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक थोरात करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com