Nagpur Medical News: धक्कादायक! नागपूरच्या मेडीकलमध्ये वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू; का वाढतंय मृत्यूचं प्रमाण?

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur News
Nagpur News Saam Tv

नागपूर : नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी मेडिकलमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण २.४६ टक्के इतकं होतं. ही माहिती आरटीआयतून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण दरवर्षी का वाढत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. (Latest Marathi News)

Nagpur News
PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

नागपूरच्या (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेडीकलमध्ये गेल्या वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. मेडीकलमध्ये जन्मलेल्या एकूण नवजात बालकांच्या तुलनेत २०२२ मध्ये २.४६ टक्के नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या तीन वर्षांत ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. माहितीच्या अधिकारात (RTI) हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करुनंही राज्य सरकारला नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत आहेत. नागपूर मेडीकलमध्ये २०२० या वर्षांत ९३५३ बालकांचा जन्म झाला, यापैकी २०५ बालकांचा मृत्यू झाला आहे.

२०२१ या वर्षांत ७४९३ बालकांचा जन्म झाला, यापैकी १७६ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर २०२२ या वर्षांत ९६३० बालकांचा जन्म झाला, यापैकी २३७ बालकांचा मृत्यू झाला आहे.

Nagpur News
Nagpur News : शाळेत जाण्यासाठी आईने रागावले, 15 वर्षीय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

२०२० ते २०२२ या तीन वर्षांत नागपूर मेडीकलमध्ये तब्बल ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. कमी असलेलं बाळांचं वजन, कमी दिवसांचं बाळ, जन्मजात इन्फेक्शन आणि न्यूमोनिया ही बाळांच्या मृत्यूची प्रमुख कारणं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com