
Aurangabad Gold Mobile News : तुम्ही जो स्मार्ट फोन वापरताय तो सोन्याचा आहे असं म्हणलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते खरं आहे. कारण तुमच्या स्मार्टफोनमध्ये 24 कॅरेट सोनं आहे. प्रत्येकाच्या हातात असलेला हा स्मार्ट फोन सोन्याचा आहे असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, तुमच्या स्मार्ट मोबाईलमध्ये खरंच 24 कॅरेट शुद्ध सोनं वापरलं गेलंय.
सध्या स्मार्टफोनची हौस सगळ्यांना आहे, त्यात आता तो सगळ्यांच्या गरजेचा झालाय. त्या स्मार्ट फोनमध्ये सोनेच काय तर चांदीही असते. मोबाइल (Mobile) बनविताना त्यात अनेक लहान-लहान वस्तू, सर्किट, चीप, कंडक्टर्स आदींचा वापर होतो. वीज वाहून नेण्यासाठी त्यात कंडक्टर (वाहक) वापरले जातात. सोने हा धातू विजेचा उत्तम वाहक असल्याने मुख्यत्वे त्याचा वापर मोबाइलच्या मदरबोर्डमध्ये केला जातो. हे सोने १०० टक्के शुद्ध असते.
सध्या वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या किमतीचे स्मार्ट फोन आहेत. त्या स्मार्टफोनच्या किमतीवरून त्यात किती सोन्याचा (Gold) वापर केला आहे, त्या फोनमध्ये असलेल्या सुविधावरून लक्षात घेता येते. नेमके किती सोने असते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल?
आज सोन्याचा दर तोळ्याला 58 हजाराच्या जवळ आहेत. त्यामुळे मोबाइलमधील सोने काढता आले तर, असा विचार कुणाच्याही मनात येऊ शकतो. परंतु हे सोने काढणे शक्य नाही. कारण मोबाइलमध्ये सोने नेमके कुठे आहे, हे शोधणे सर्वात कठीण आहे.
एखादा हार्डवेअर इंजिनीअरच हे करू शकेल. जर तुम्ही ते काढायला गेलात तर फायदा तर होणारच नाही, उलटी नुकसान होईल. त्यामुळे हातात स्मार्ट मोबाईल आहे म्हणून तो फोडून सोनं काढण्याचा जर विचार करत असाल तर थोडं थांबा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.