Nashik News : नाशिकला साथीच्या आजारांचा विळखा; स्वाईन फ्लूचे २४ तर डेंग्यूचे १९ रुग्ण आढळले

नाशिक जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, कारण...
Swine flue cases in nashik
Swine flue cases in nashiksaam tv

नाशिक : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच नाशिक जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठवडाभरात नाशिकमध्ये (Nashik) स्वाईन फ्ल्यूचे (Swine Flu Patients) २४ तर डेंग्यूचे १९ रुग्ण आढळले आहेत. तर तापाची लक्षणे असलेल्या ७३० रुग्णांची सरकारी रुग्णालयात नोंद करण्यात आलीय. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे नाशिकमधील नागरिक (Epidemic Disease) साथीच्या आजारांच्या विळख्यात सापडले आहेत.

Swine flue cases in nashik
Satara : सातारा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा; उद्या काेयनेचे दरवाजे चार फुटांनी उचलणार

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात साथीच्या आजारांची साथ पसरली आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि तापाच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्दी-खोकल्याचे रुग्ण नाशिकमध्ये वाढताना दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजाराची लाट नाशिकमध्ये पसरली आहे.नाशिक शहारात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

पाण्याच्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या डासांमुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. महापालिकेच्या पेस्ट कंट्रोलचे दावेही फोल ठरले आहेत. आरोग्य यंत्रणांनी या आजारांच्या समस्येवर वेळीच उपचार करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कोणताही त्रास अंगावर न काढता तातडीनं उपाययोजना कराव्यात, असं आवाहन नाशिकचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक उत्कर्ष दुधेडीया यांनी केलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com