Parbhani Accident : लातूर- नागपूर बस, ट्रॅव्हल्स अपघातात २५ जखमी, दहा गंभीर; चालक मृत्यूमुखी

या घटनेची माहिती मिळतात गंगाखेड पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली.
parbhani , gangakhed parli road, accident.
parbhani , gangakhed parli road, accident.saam tv

परभणी : गंगाखेड परळी रस्त्यावरील (gangakhed parli road) करम पाटील जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास बस (msrtc bus) आणि ट्रॅव्हल्सचा अपघात (accident) झाला. या अपघातात सुमारे पंचवीस लाेक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातामधील जखमींवर (injured) उपचार सुरु आहेत. दरम्यान या अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यात एसटी चालक हनुमंत व्हावळे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Parbhani Accident News)

गंगाखेड परळी रोडवरील करम पाटील जवळ नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स आणि लातूरहून नागपूरला जाणा-या बसचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना रात्री अकरा वाजेपर्यंत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

parbhani , gangakhed parli road, accident.
Breaking News : शाळेत जाणाऱ्या मुलीला ट्रकनं चिरडलं, संतप्त गावकऱ्यांनी ट्रकच पेटवला

या अपघातामधील जखमी झालेल्यांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड (Nanded), अंबाजोगाई (Ambajogai) आणि परभणी (Parbhani) येथे हलवण्यात आले. या अपघातामधील दहा जखमींना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

parbhani , gangakhed parli road, accident.
Amboli Ghat : आंबोली घाटात ट्रकची चाकं निखळली; एकेरी वाहतुक सुरु

दरम्यान अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळताच गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच जखमी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मदत केल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. या घटनेची माहिती मिळतात गंगाखेड पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com