Accident News: फिरायला आला अन् जीव गमावून बसला, भीषण अपघातात 25 वर्षीय रायडरचा जागीच मृत्यू

हा बाईक रायडर डहाणूमधील आंबोली येथे रायडिंगसाठी आपल्या मित्रासोबत आला होता.
Road Accident On Mumbai Ahmedabad National Highway
Road Accident On Mumbai Ahmedabad National HighwaySaamtv

रुपेश रिपोर्टर, पालघर

Mumbai: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच भीषण अपघातात बाईक रायडरचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हा बाईक रायडर डहाणूमधील आंबोली येथे रायडिंगसाठी आपल्या मित्रासोबत आला होता. अपघातात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. (Accident News)

Road Accident On Mumbai Ahmedabad National Highway
Gautami Patil: नृत्यांगणा मृणाल कुलकर्णींनी गौतमी पाटीलला सुणावले खडेबोल, म्हणाल्या; 'प्रसिद्धीसाठी घाणेरडी....'

याबाबत अधिक माहिती अशी की, आज प्रजासत्ताक दिनाचा सर्वत्र जल्लोश पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त शेकडो बाईक राईडर्स मुंबईहून पालघरमध्ये दाखल झाले होते. यामधीलच एका रायडरचा बाईक अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बाईकने ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये कैलास मौर्या या 25 वर्षीय बाईक रायडरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाईकवर मागे बसलेला आशिष यादव हा तरुण गंभीर जखमी अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

Road Accident On Mumbai Ahmedabad National Highway
Viral Video: आईचं प्रेम! अनोळखी माणसाने दिलेलं खायचं नाही, माकडाने दिले बाळाला धडे; जबरदस्त Video व्हायरल...

दरम्यान, या अपघातातील दोन्हीही बाईक रायडर हे वसईमधील सातिवली येथील रहिवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे. अपघातात आशिष यादव हा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com