नांदेड जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३८४ शाळेत विद्यार्थ्यांची २७ टक्के उपस्थिती

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
नांदेड जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३८४ शाळेत विद्यार्थ्यांची २७ टक्के उपस्थिती
नांदेड - पहिल्या दिवशी ३८४ शाळेत २७ टक्के उपस्थिती

नांदेड ः मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नसल्याने आॅनलाईन अध्यापन सध्या सुरु आहे. मात्र, कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आदेश शासनाने सात जुलै रोजी काढला होता. त्यानुसार नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३८४ शाळांची घंटा २७ टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १५) वाजली असून, ग्रामपंचायतचा ठराव नसल्याने २१९ शाळा अद्यापही बंदच आहेत. 27 percentage- attendance -of- students -in 384 -schools-Nanded -district- on- the- first- day

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहिलेले आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरु करण्याचे आदेश सात जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार ग्रामीण भागातील ६०३ पैकी ३८४ शाळा सुरु करण्याला ग्रामपंचायतींनी शिफारसपत्र दिले. त्यामुळे ३८४ शाळा गुरुवारी २७ टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु झाल्या आहेत. उर्वरीत २१९ शाळांच्या शिफारसी घेण्याचे काम सुरु असून, त्याही लवकरच सुरु होतील असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी सांगितले.

हेही वाचा - मागील वीस वर्षापासून संस्कृती संवर्धन मंडळ लाठ खुर्द गावासाठी काम करत आहे

ग्रामपंचायतचा ठराव महत्त्वाचा

एक हजार ४५० गावे कोरोनामुक्त झाले असून २७६ गावांमध्ये कोरोनाने शिरकावच केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यास हरकत नाही. मात्र, त्यासाठी त्यागावातील ग्राम पंचायतचा ठराव असणे आवश्यक आहे. आठवी ते बारावीच्या वर्गामध्ये ग्रामीण भागात एक लाख ८९ हजार विद्यार्थी आहेत. एका ग्रामसेवकांकडे जास्तीचे गावे असल्यामुळे ग्रामपंचायतच्या शिफारसी घेण्यास वेळ लागत असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्येही कमी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा कोरोना नियमावलींचे पालन करून गुरुवारपासून सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवशी २७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परंतु, काही दिवसांतच विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याला प्राधान्य दिले जाईल तसेच उर्वरीत २१९ शाळाही लवकरच सुरु होतील.

- माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com