वीज निर्मिती संकटाचा सामना करावा लागणार नाही; काेयना धरण व्यवस्थापनेचा दावा

यामुळे परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
saam breaking news logo
saam breaking news logosaam tv

काेयनानगर : सातारा (satara) जिल्ह्यातील आणि संपुर्ण राज्यातील सर्वात मोठे धरण तसेच राज्याच्या वीजनिर्मितीत महत्वाची भूमिका बजावणा-या कोयना धरणात (koyna dam) आता केवळ २७ टीएमीसी (tmc) इतकाच पाणी साठा (water storage) शिल्लक राहिला आहे. (koyna dam latest marathi news)

कोयना धरणाची १०५ टीएमसी पाणी साठ्याची क्षमता आहे. उन्हाच्या माेठ्या तडाक्यामुळे बाष्पीभवनामुळे येथील पाणी साठा कमी हाेत आहे. मे महिन्याचा मध्यतंर लाेटला आहे. येत्या जुन महिन्यात पावसाची प्रतीक्षा पहावी लागणार आहे. जर या वर्षी पावसाने ओढ दिली तर मात्र कोयनेतून होणाऱ्या वीज निर्मितीचे संकट गडद होईल.

saam breaking news logo
Ajit Pawar: कूठं फेडाल ही पापं! तुम्हांला तर नरकातच जावं लागेल : अजित पवार

दरम्यान वीज निर्मीतीत काेयनेची महत्वाची भुमिका आहे. त्यातच काेयनेतील पाणी साठा कमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान कोयना धरणात सध्या ३१ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. यापैकी २६ टीएमसी पाणी साठा वापरला जात असतो आणि इतर पाच टीएमसी पाणी साठा हा मृत पाणी साठा असतो. सध्याच्या हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजा नुसार पावसाने जरी ओढ दिली तरी या वर्षी तरी कोयनेच्या उपलब्ध पाणी साठ्या नुसार वीज निर्मिती संकटाचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास कोयना धरणाचे उपविभागीय अभियंता आशिष जाधव यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

saam breaking news logo
तिहेरी अपघातात ३ ठार, ६ गंभीर जखमी; लग्न साेहळ्यास पुण्याला निघाली हाेती CAR
saam breaking news logo
Thomas Cup 2022 : थाॅमस कप भारताने जिंकला; इंडोनेशियाचा दारुण पराभव
saam breaking news logo
...अन्यथा कांदा उत्पादकांसह 'स्वाभिमानी' रस्त्यावर उतरेल; तुपकरांचा सरकारला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com