Eknath Shinde on Jobs: 3 लाख नोकऱ्या देण्याचं आमचं टार्गेट...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तरुणांना आश्वासन

CM On Maharashtra Government Jobs: सध्याचं सरकार तरुणांच्या रोजगारासाठी काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam TV

Mumbai Political News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आजही भाजप आणि शंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज बौठक होण्याची शक्यता आहे. अशात आज एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे पी नड्डा यांच्यवर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच सध्याचं सरकार तरुणांच्या रोजगारासाठी काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Latest Cm Eknath Shide News)

आज मुंबईत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थीत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात तब्बल ३ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आमचं टार्गेट असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.

CM Eknath Shinde
Nagpur Crime News : भरदिवसा पेट्राेल पंप मालकाला संपवलं, दाेन लाखांची लूट; नागपूरात तिघांचा शाेध सुरु

सध्याच्या काळात अनेक देशांची आर्थिक व्यवस्था ढासळत असताना आपण जी 20 चं अध्यक्ष पद भूषवतो आहोत. देशाचं भविष्य याच युवा पिढीच्या हाती आहे. राज्याच्या प्रत्येकाला रोजगार या योजनेअंतर्गत अनेक शिबीरे भरवली जात आहेत. जास्तीत जास्त युवकांना याचा कसा फायदा होईल याकडे सरकारचं लक्ष आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

३ लाख विद्यार्थ्यांना मिळणार नोकऱ्या

आगामि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात जे पी नड्डा हे देखील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून ३ लाख विद्याथ्यांना रोजगार मिळाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

CM Eknath Shinde
Buldhana Accident News: घर झालं पोरकं, पाहताही आलं नाही भावाला बहिणीचं लग्न; अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू

कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, 75 हजार नोकऱ्या एकाच वेळी देण्याचं काम सरकार करत आहे. 2 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम झालं आहे. जून महिन्यात उद्योजकांना आम्ही भेटणार आहेत. पुढे 3 लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं आमचं टार्गेट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कमी पैशांत घेता यावे यासाठी आम्ही काम करत आहोत. शिक्षण देण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. पालिकेच्या शाळेत स्किल डेव्हपमेंट सेंटर सुरू करण्यासाठी MOU झालेत, असंही शिंदेंनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच पुढे जे पी नड्डा यांच्या विषयी बोलताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, तुमच्या नावात जे पी आहे. म्हणजे जबान के पक्के. पंतप्रधान मोदींनी देखील युवा पिढीची ताकद ओळखली आहे. युवा पिढीसाठी ते सातत्याने काम करत आहेत. हा देश युवकांवरच चालणार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com