Heat Stroke in Kolhapur : कोल्हापुरात उष्माघाताने 3 जण दगावल्याची शक्यता; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

या वर्षी एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Heat Wave
Heat Wavesaam tv

Kolpahur News : राज्यातील एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला तर दुसरीकडे मात्र तापमानाचा पारा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे.

त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाही लाही होत असताना उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालं आहे. त्यातच उष्माघाताने कागल तालुक्यातील तीन जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Heat Wave
Maharashtra Rain : पुण्यासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट; पुढील २-३ दिवस अवकाळीसह गारपीट अन् वादळी वाऱ्याचा अंदाज

कागल तालुक्यातील साताबाई पाटील ( वय वर्षे 56), जनाबाई कांबळे (वय वर्षे 80) आणि सत्तापा पाटील ( 54 ) असे मृत व्यक्तींचे नवे आहे. तिघांनाही उष्णतेचा त्रास झाल्यानंतर मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणं आहे.(Kolhapur News)

कागल तालुक्यातील साताबाई शिवाजी पाटील या सोमवारी सकाळी शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्या होत्या. दुपारी बारा वाजता हवेत उष्मा वाढल्याने (Heat Stroke) त्या घरी आल्या. तहान लागल्याने त्या पाणी प्यायल्या. नंतर क्षणार्धात चक्कर येऊन कोसळल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यांच्या मागे पती एक मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा हा परिवार आहे.

नाबाई कांबळे यांना देखील चार दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने आणि उन्हाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचंही निधन झालेलं आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एकाच दिवसात उष्माघाताने दोन महिलांसह एकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Heat Wave
Maharashtra Politics : डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन लागलं तर... भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य

साताप्पा पाटील यांना दोन दिवसांपूर्वी उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोल्हापुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहेत्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com