औरंगाबादमध्ये '30-30' घोटाळा !; भरघोस व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना गुंतवणूकीवर भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड याने 30-30 योजनेत लोकांना पैसे गुंतवण्यासाठी सांगितले.
औरंगाबादमध्ये '30-30' घोटाळा !; भरघोस व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक
औरंगाबादमध्ये '30-30' घोटाळा !; भरघोस व्याजाचे आमिष दाखवून फसवणूकSaam TV

औरंगाबाद : गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रक्कम जमा करून फसवणूक करणारा 30-30 चा नवा घोटाळा औरंगाबाद जिल्ह्यात समोर आला आहे. 30-30 घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना गुंतवणूकीवर भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड याने 30-30 योजनेत लोकांना पैसे गुंतवण्यासाठी सांगितले. सुरुवातीला बँकेकडून मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक नफा देऊन सुरवातीला स्व:ताची ओळख तयार केली. त्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यापासून फरार आहे. त्यामुळे पैसे मिळण्याची अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलने बिडकीन पोलीस गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबादमध्ये '30-30' घोटाळा !; भरघोस व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक
सांगलीकरांनो सावधान! ‘व्याजाला भुलाल आणि मुद्दलीला मुकाल'; अशी होते फसवणूक

'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केलं. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फसवणूक झालेल्यानी पुढं यावं असे आवाहन पोलिस करताय.

काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भिती व्यक्त होतेय.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com