Pandharpur : पंढरपूरात बासुंदीतून झाली विषबाधा; ३० विद्यार्थी रुग्णालयात दाखल

हे सर्व विद्यार्थी राज्याच्या विविध भागातून येथील आश्रमात शिक्षणासाठी आले आहेत.
pandharpur,
pandharpur, saam tv

पंढरपूर : शेगाव दुमाला परिसरातील एका वारकरी शिक्षण संस्थेतील तीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना (students) येथील उपजिल्हा रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व विद्यार्थी राज्याच्या विविध भागातून येथील आश्रमात शिक्षणासाठी आले आहेत. (Pandharpur Latest Marathi News)

शेगाव दुमाला येथील ६५ एकर जवळ विठ्ठल आश्रम आहे. येथील आश्रमात विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण दिले जाते. रविवारी दुपारी आश्रमात विद्यार्थ्यांना जेवणात बासुंदी (Basundi) देण्यात आली होती. जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रुग्णालयातून मिळाली. हे सर्व विद्यार्थी राज्याच्या विविध भागातून येथील आश्रमात शिक्षणासाठी आले आहेत.

pandharpur,
Indore-Pune Bus Accident: इंदूर-पुणे बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली, १२ प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

विद्यार्थ्यांना रुग्णालयात केलं दाखल

या घटनेतील सुदर्शन सगरे, प्रदीप शिरोळे, ओंकार निर्मळ, प्रणव शिंदे, गोपाळ सुलतानी, दर्शन जाधव, गौरव जायभाय, विनायक ताडे, सिध्देश्वर शिर्के, वैभव कुंभार, प्रफुल्ल नवले, सुदर्शन सुलतानी, अजिनाथ मालकर, केशव पवार, हरिओम तळेकर , अभिजीत शिंदे, लक्ष्मण हुके, ऋषीकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषीकेश तांबे, अर्जून पवार, गणेश राहाणे, प्रताप गिते, ऋषीकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, माऊली गोनासे, आदित्य डावरे, स्वागत गाजरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली.

Edited By : Siddharth Latkar

pandharpur,
Buldhana : कर्जबाजारीपणाला कंटाळून वडगावातील शेतकऱ्याची आत्महत्या
pandharpur,
वरूड जहांगीरात ढगफुटी; बोरीच्या पुलावरील वाहतूक ठप्प, बाभुळगांवशी गावांचा संपर्क तुटला
pandharpur,
दामिनी पथकाची धाडसी कारवाई; BOI चं एटीएम केंद्र फाेडणा-यांवर मारली झडप, एक अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com