Beed News: दुबार पेरणीच्या भीतीने 30 वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन; बीड जिल्ह्यातील दुर्देवी घटना

Beed Farmer News: याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv

Beed News Today: बीड जिल्ह्यात यावर्षी उशिरा मान्सून दाखल झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या यातच गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने आलेले पीक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांसमोर आहे. तसेच दुबार पेरणी करावी लागते की काय यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (Latest Marathi News)

Beed News
Nashik Crime News: उंटवाडीत 2 गट भिडले, एकावर तलवारीने वार; धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेरात कैद

शेतकरी (Farmer) आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात बीड जिल्ह्याची ओळख पडली आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी अशा एक ना अनेक समस्याने नैराश्यात आलेला शेतकरी आत्महत्या करतोय. त्यातच आता बीडमध्ये (Beed) आणखी एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.

याबाबत आधीकी माहिती अशी की, पीककर्ज काढून पेरणी केली. मात्र, पाऊस (Rain) पडत नसल्यामुळे दुबार पेरणी करावी कशी? या विवचनेतून बीडच्या कुंबेफळ येथे एका 30 वर्षीय शेतकऱ्याने घराच्या दारासमोर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. महेश भागवत थोरात रा. कुंबेफळ ता. केज असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

Beed News
Bhandara Accident News: भरधाव कारने दुचाकीसह रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला उडवलं; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

मयत महेश यांच्या आई-वडिलांच्या नावे जवळपास 4 एकर जमीन आहे. पाऊस कमी झाल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळं याच विवंचनेत त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे. (Beed News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com